Join us

मराठी इंडस्ट्रीचे धन्यवाद मानतो

By admin | Published: May 28, 2016 2:10 AM

मित्राचे कुणीतरी फक्त १० हजार रुपयांसाठी अपहरण केलंय आणि तेही परक्या शहरात... दोन तासांत १० हजार रुपये पोहोचले नाहीत तर मित्राचा जीव घेण्याची धमकी... आणि ते जमविण्यासाठी

मित्राचे कुणीतरी फक्त १० हजार रुपयांसाठी अपहरण केलंय आणि तेही परक्या शहरात... दोन तासांत १० हजार रुपये पोहोचले नाहीत तर मित्राचा जीव घेण्याची धमकी... आणि ते जमविण्यासाठी मित्रांची होणारी तगमग... मित्र, नातेवाईक म्हणवून घेणाऱ्यांचे टराटरा फाटणारे मुखवटे, पैसे मागितल्यावर फोन स्विच आॅफ करणारी गर्लफ्रेंड, त्याच वेळी गरीब दुकानदाराचा दिलदारपणा... अशा कितीतरी मनाला रिअल लाइफमध्ये भिडणाऱ्या गोष्टी ‘पैसा पैसा’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक जोजी रेशल जॉब यांनी अभिनेता सचित पाटील व स्पृहा जोशी यांच्या अभिनयातून समाजापुढे ठेवल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाददेखील प्रचंड मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर केवळ पाच दिवसांत ६५ लाख कमाविले आहेत. तसेच या चित्रपटाचे यश पाहता, निर्माते शिवविलाश चौरसिया ‘लोकमत सीएनएक्स’शी संवाद साधताना म्हणाले, ‘या यशाबद्दल सर्वांत पहिले मी देवाचे आभार मानतो. त्याचबरोबर मराठी इंडस्ट्री व प्रेक्षकांचेदेखील मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी मला एवढं प्रेम दिलं. भविष्यातदेखील अजूनही मराठी चित्रपट करणार आहे. हे चित्रपट करताना कोणताही टाइमपास न करता समाजाला चांगले संदेश देणारे व ‘पैसा पैसा’सारखे वास्तव जीवनाशी संबंधित असणारे चित्रपट करणार आहे.’ पैसा पैसा चित्रपटासाठी थिएटर उपलब्ध होत नव्हते. शोसाठी वेळ मिळत नव्हता, पण तरीही इतक्या कठीण परिस्थितीतून मिळालेल्या या यशाचा खूप आनंद होत आहे. भविष्यातदेखील शंभर टक्के मराठीत काम करणार आहे. त्याचबरोबर अनेक भाषेतदेखील चित्रपट करणार आहे. - जोजी रेशल जॉब, (दिग्दर्शक)