बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan)ने सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मॉडेल म्हणून काम करणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनने चाहत्यांची मने तर जिंकलीच पण बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली. पण ऐश्वर्या राय क्वचितच कोणत्याही चित्रपटात बोल्ड किंवा इंटिमेट सीन करताना दिसली.
ऐश्वर्या राय बोल्ड सीन्स का करत नाही? हा खूप विचित्र प्रश्न आहे, पण एकदा ऐश्वर्या रायला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती खूप संतापली होती. हा प्रश्न ऐश्वर्या राय बच्चनला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये विचारण्यात आला जिथे ती तिच्या 'द पिंक पँथर 2' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.
ऐश्वर्या राय बच्चनला रिपोर्टरने विचारले की, तिला चित्रपटांसाठी इंटिमेट सीन करण्यासाठी कंफर्टेबल का नसते? यावर ऐश्वर्या राय बच्चन म्हणाली की, मी पडद्यावर कधीही इंटिमेटी आणि नग्नता एक्सप्लोर केलेली नाही आणि मला ती एक्सप्लोर करण्यात रसही नाही. पण पत्रकार एवढ्यावरच थांबला नाही.