Join us

रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण'मध्ये विभीषणच्या भूमिकेत दिसणार हा साऊथचा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 6:36 PM

Ramayana Movie : नितेश तिवारी यांचा बहुचर्चित चित्रपट 'रामायण'च्या कास्टिंगबाबत अनेक अपडेट्स सातत्याने येत आहेत.

नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांचा बहुचर्चित चित्रपट 'रामायण'(Ramayana Movie)च्या कास्टिंगबाबत अनेक अपडेट्स सातत्याने येत आहेत. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर निर्मात्यांनी सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवी (Sai Pallavi) आणि रावणाच्या भूमिकेसाठी यश(Yash)ची निवड केली आहे. यासोबतच हनुमानाच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी सनी देओलशी बोलणी सुरू केली असून त्यानंतर लारा दत्ताला कैकेयीच्या भूमिकेसाठी साइन करण्यात आले आहे. दरम्यान, आता नवीन अपडेट म्हणजे विजय सेतुपती 'रामायण'मध्ये विभीषणाची भूमिका साकारू शकतो.

'पिंकविला'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये रावणाचा भाऊ विभीषणाची भूमिका साकारण्यासाठी विजय सेतुपतीशी चर्चा करत आहे. सूत्रांनी सांगितले की, 'नितेश तिवारी यांनी अलीकडेच विजय सेतुपतीची भेट घेतली आणि त्याला स्क्रिप्ट सांगितली. त्याला स्क्रीप्ट आवडली असून  त्याने चित्रपटात इंटरेस्टही दाखवला. तथापि, विजयने अद्याप पुष्टी केलेली नाही कारण तो रामायणच्या टीमशी लॉजिस्टिक्स आणि फीबद्दल चर्चा करत आहे.

'रामायण'चे शूटिंग मार्चमध्ये सुरू होणार'रामायण' बद्दल बोलायचे तर, रणबीर कपूर आणि सई पल्लवीसोबत हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये फ्लोरवर जाणार आहे. ही जोडी मार्चमध्ये एकत्र चित्रीकरणाला सुरुवात करेल आणि मे महिन्याच्या अखेरीस शूटिंग पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. रावणाची भूमिका करणारा यश, जून किंवा जुलै २०२४ मध्ये रामायणाच्या सेटवर सामील होईल आणि १५ दिवसांत चित्रपटाच्या पहिल्या भागाचे वेळापत्रक पूर्ण करेल. 'रामायण: भाग एक'चे शूटिंग जुलैपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर निर्माते चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनवर दीड वर्ष घालवतील.

टॅग्स :रणबीर कपूरसाई पल्लवी