Join us

'रामायण'च्या सेटवरुन फोटो लीक झाल्याने दिग्दर्शकाचा मोठा निर्णय, आता शूटिंग करताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 1:40 PM

Ramayana Movie : दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी २ एप्रिलपासून त्यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पण शूटिंग सुरू झाल्यानंतर काही तासांतच सेटवरून कलाकारांच्या लूकपर्यंत सर्व काही लीक झाले.

दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी २ एप्रिलपासून त्यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' (Ramayana Movie) चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पण शूटिंग सुरू झाल्यानंतर काही तासांतच सेटवरून कलाकारांच्या लूकपर्यंत सर्व काही लीक झाले. अलीकडेच एक व्हिडिओ लीक झाला होता, ज्यामध्ये 'रामायण'चा सेट दिसत होता, जो अभिनेत्री आकृती सिंहने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. यानंतर या चित्रपटातील राजा दशरथची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल आणि लारा दत्ता यांचे लूकही लीक झाले होते. यामुळे नितीश तिवारी यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या सेट्स आणि कलाकारांचे लूक लीक झाल्यामुळे नितेश तिवारी संतापले असून त्यांनी सेटवर 'नो फोन' पॉलिसी लागू केली आहे. 

रामायणच्या सेटवरील फोटो लीक होताच सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाल्याची माहिती आहे. चाहत्यांनी नितेश तिवारीवर कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. सेटवर फोन बंदी घालण्याची विनंती त्यांनी केली. रिपोर्ट्सनुसार, लारा दत्ताने 'रामायण'मध्ये कैकेयीची भूमिका साकारली होती आणि तिचा लूकही लीक झाला आहे, जे पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. नितेश तिवारीही संतापले आहेत.

नितेश तिवारी संतापले'इंडिया टूडे'च्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, लीक झालेल्या फोटोंमुळे दिग्दर्शक नितेश तिवारी खूप संतापले आहेत. त्यामुळे सेटवर फोन न करण्याचे कठोर धोरण लागू करण्यात आले आहे. नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमने अतिरिक्त कर्मचारी आणि क्रू यांना शूटिंग सुरू झाल्यावर सेटबाहेर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे कलाकार आणि तंत्रज्ञ दृश्यासाठी आवश्यक आहेत त्यांनाच सेटवर राहण्यास सांगितले आहे. इतर सर्वांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

२ एप्रिलपासून शूटिंगला झाली सुरूवात२ एप्रिलला नितीश तिवारीने ज्युनियर आर्टिस्ट आणि बालकलाकारांसोबत 'रामायण'चे शूटिंग सुरू केल्याची माहिती आहे. ३ एप्रिल रोजी काही फोटो लीक झाले होते, ज्यामध्ये दशरथची भूमिका करणारा अरुण गोविल मुलांसोबत एक सीन करताना दिसत होते. कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ताही दिसली होती. हे पाहून चाहते संतापले. या चित्रपटात रणबीर कपूरने रामाची तर साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता यश लंकापती रावणाची तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे.

टॅग्स :रामायणरणबीर कपूर