घोषणा करताच वादात सापडला विवेक अग्निहोत्रींचा आगामी The Delhi Files सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:11 PM2022-04-19T12:11:00+5:302022-04-19T12:33:28+5:30

The Delhi Files : विवेक अग्निहोत्री यांनी गेल्याच आठवड्यात 'द दिल्ली फाइल्स'ची घोषणा केली होती आणि सिनेमाबाबत माहितीही दिली होती

The Delhi Files : Maharashtra sikh association oppose the Vivek Agnihotri's next film The Delhi Files | घोषणा करताच वादात सापडला विवेक अग्निहोत्रींचा आगामी The Delhi Files सिनेमा

घोषणा करताच वादात सापडला विवेक अग्निहोत्रींचा आगामी The Delhi Files सिनेमा

googlenewsNext

दिग्दर्शक-निर्माता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) त्यांच्या 'द काश्मीर फाइल्स' सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहे. १४ कोटी रूपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं या सिनेमाला प्रेम मिळालं. आता 'द काश्मीर फाइल्स'नंतर विवेक अग्निहोत्री 'द दिल्ली फाइल्स' (The Delhi Files) हा सिनेमा घेऊन येणार आहे. १९८४ मधील दंगलीचा काळा अध्याय ते या सिनेमातून मांडणार आहे. १९८४ मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीची कहाणी ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत.

विवेक अग्निहोत्री यांनी गेल्याच आठवड्यात 'द दिल्ली फाइल्स'ची घोषणा केली होती आणि सिनेमाबाबत माहितीही दिली होती. विवेक अग्निहोत्रीच्या या सिनेमाच्या घोषणेनंतर आता महाराष्ट्र शीख असोसिएशनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र शीख असोसिएशनचं म्हणणं आहे की, 'फिल्म मेकर्सनी समाजाची शांती भंग करणं टाळलं पाहिजे'.

विवेक अग्निहोत्री नव्या सिनेमाच्या घोषणेनंतर महाराष्ट्र शीख असोसिएशनने सांगितलं की, 'रचनात्मक अभिव्यक्ती आणि व्यक्तीगत लाभासाठी शीख विरोधी दंग्यासारख्या घटनेच्या व्यावसायीकरणाचा आम्ही विरोध करतो'. आता यावर विवेक अग्निहोत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'एका फिल्ममेकर म्हणून त्यांना स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या अंतर आत्म्याच्या सुचवलेल्या दिशेने सिनेमा बनवण्याचा अधिकार आहे.

ते म्हणाले की, 'मला माहीत नाही ही कोणती संघटना आहे. मी एक भारतीय आहे. मी अशा देशात राहतो जिथे स्व:ताला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मला अधिकार आहे की, मी स्वत:ला व्यक्त करावं. मी ते बनवणार जे बनवायचं आहे. लोक अंदाज लावत आहेत की मी काय बनवू शकतो, काय बनवणार. ते असं करू शकतात. पण शेवटी सीबीएफसी हे ठरवणार की मी कसा सिनेमा बनवणार आणि तो रिलीज करू शकतो किंवा नाही.
 

Web Title: The Delhi Files : Maharashtra sikh association oppose the Vivek Agnihotri's next film The Delhi Files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.