Join us

भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या 'द एलिफंट व्हिस्परर्स'चे खरे हिरो कोण? हत्तींना जीव लावणाऱ्या जोडप्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 16:11 IST

'द एलिफंट व्हिस्पर्स' ही खऱ्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म आहे.

Oscar Awards 2023 : भारतीय सिनेजगतासाठी आजचा दिवस खूप खास आहे. संपूर्ण भारताचं लक्ष आजच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलं होतं आणि भारताने यंदा दोन पुरस्कार नावावर केले आहेत. आज सोहळ्यात देशाला पहिला ऑस्कर मिळाला तो 'द एलिफंट व्हिस्पर्स' (The Elephant Whisperers) या शॉर्ट फिल्मसाठी. तुम्हाला माहितीए का 'द एलिफंट व्हिस्पर्स'चे खरे हिरो कोण आहेत?

'द एलिफंट व्हिस्पर्स' ही खऱ्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म आहे. कार्तिकी गोंजाल्विस (Kartiki Gonsalves) यांनी दिग्दर्शित केली आहे. याची कहाणी बोमन आणि बेली यांच्या जीवनावर आधारित आहे. हे एक आदिवासी जोडपं आहे. आदिवासी पाड्यात राहणापे रघु आणि अम्मु या दोन हत्तींचं त्यांनी पालन केलं आणि त्यांना चांगलं जीवन दिलं. ४० मिनिटांच्या या फिल्ममध्ये मनुष्य आणि प्राण्यांमधील भावनिक, संवेदनशीलृ दृश्य दाखवण्यात आली आहे.सामान्य आयुष्य जगणारे बोमन आणि बेली यांचा प्राण्यांप्रती असलेले प्रेम आणि त्यांचा संघर्ष यावर फिल्म आधारित आहे. 

तमिळनाडूच्या मुदाममल्लई नॅशनल पार्क मधील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या बोमन आणि बेली यांना २०१७ मध्ये एक जखमी हत्तीचे पिल्लू सापडले. या जोडप्याने त्या पिल्लाची काळजी घेतली. त्याला बरे केले. त्याचं नाव रघु ठेवले. यानंतर अजुन एक हत्ती त्यांच्यासोबत जोडला गेला. त्याचे नाव अम्मु ठेवण्यात आले. रघु मोठा झाल्यावर त्याच्या सुरक्षेसाठी त्याला एका योग्य माणसाकडे सोपवले. आता या फॅमिलीत केवळ बोमन, बेली आणि अम्मु राहिले आहेत जे आनंदात जगत आहेत आणि रघुला मिस करत आहेत.

टॅग्स :ऑस्करशॉर्ट फिल्म