Join us

धर्मेंद्रचा मुलगा असण्याचं सनी देओलवर होतं प्रेशर; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 7:34 AM

Sunny Deol: 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये सनीने त्याच्या फिल्मी प्रवासावर भाष्य केलं.

बी-टाऊनमध्ये (bollywood) असे काही कलाकार आहेत जे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. यात त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यदेखील कायम चर्चेत येत असतं. सध्या इंडस्ट्रीतल्या अशाच एका भारदस्त पर्सनालिटी असलेल्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता म्हणजे सनी देओल (Sunny Deol). ९० चा काळ गाजवणाऱ्या सनीचा अलिकडेच 'गदर 2' हा सिनेमा रिलीज झाला. ज्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. अलिकडेच त्याने 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने स्टारकिड्स असण्यावर भाष्य केलं

सध्या सोशल मीडियावर 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' हा बराच चर्चेत येत आहे. अलिकडेच  या कार्यक्रमात सनी देओल आणि बॉबी देओल ही भावंडांची जोडी सहभागी झाली होती. यावेळी सनीने त्याच्या फिल्मी प्रवासाविषयी भाष्य केलं. यात खासकरुन सुपरस्टारचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर प्रेशर होतं का? या प्रश्नाचं उत्तरही त्याने दिलं.

सनीवर होतं सुपरस्टारचा लेक असण्याचं प्रेशर?

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आपण एका सुपरस्टारचा मुलगा आहोत याचं दडपण होतं का? असा प्रश्न सनीला विचारण्यात आला. त्यावर, "खरं तर मी इतका विचारच केला नव्हता. अभिनेता व्हायचंय हे माझं आधीच ठरलं होतं. त्यामुळे मग हा प्रवास सुरु केला", असं सनी म्हणाला. पुढे बोलताना त्याने त्याच्या पहिल्या सिनेमाचा एक किस्साही सांगितला.

पुढे तो म्हणतो, "मला आजही माझ्या पहिल्या सिनेमाच्या सेटवरचा किस्सा आठवतो. 'बेताब'चं चित्रीकरण सुरु होतं. मेहबूब स्टुडिओमध्ये तिथे बॉबी सुद्धा होता. जवळपास इंडस्ट्रीमधले सगळेच लोक तिथे होते. स्टेज पूर्ण पॅक झाला होता. त्यानंतर मला काही संवाद देण्यात आहे. मी कुठेही न अडखळता, गोंधळून न जाता माझे डायलॉग्स म्हटलं. मी अजिबात घाबरलो नाही."

टॅग्स :बॉलिवूडसनी देओलधमेंद्रबॉबी देओलसिनेमासेलिब्रिटी