बॉलिवूड अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या बराच चर्चेत आहे. त्याचा चित्रपट ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’(Rocketry: The Nambi Effect) हा दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा रिलीज झाला आहे. ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ सिनेमाच्या घोषणेपासूनच त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल होतं. हा चित्रपट भारतीय वैज्ञानिक आणि एअरस्पेस इंजिनिअर नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कान्स चित्रपट महोत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी आर माधवनच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' सिनेमाचं कौतुक केलं आहे. विवेक यांनी आपल्या ट्विटर हँडलवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. 'द काश्मीर फाइल्स' या त्याच्या दिग्दर्शनाप्रमाणे रॉकेट्री बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, "कृपया या विकेंडला अभिनेता माधवनचा उत्कृष्ट पदार्पण #RocketryTheNambiEffect नक्की पाहा. तुम्हाला आपल्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटेल. जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहता तेव्हा न्याय होतो. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विवेक यांचा अंदाज आहे की 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' हा सिनेमा 'द काश्मीर फाइल्स'प्रमाणे यशस्वी होऊ शकतो. त्यांनी माधवन "प्रामाणिक अभिनेता" आणि "खरा देशभक्त" असल्याचेही म्हटलं आहे.