सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट खूप चर्चेत आहे. काश्मीर फाइल्स या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपटावरून दोन भिन्न मतप्रवाह तयार झाले आहेत. काही जणांनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे, तर काही जणांची या चित्रपटाचा विरोधही केला आहे. यापूर्वी विवेक अग्नीहोत्री यांच्या 'ताश्कंद फाईल्स'वरूनही वाद निर्माण झाला होता. परंतु आता विवेक अग्निहोत्री लवकरच दिल्ली दंगलीवरील चित्रपट घेऊन येणार आहेत.
सध्या विवेक अग्निहोत्री दे दिल्लीत झालेल्या दंगलीवर आधारित 'द डेल्ही फाईल्स' (The Delhi Files) हा चित्रपट तयार करत आहेत. यापूर्वी १३ सप्टेंबर २०२१ रोजीच विवेक अग्निहोत्री यांनी 'द डेल्ही फाईल्स' या चित्रपटाची घोषणा केली होती. तसंच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा पोस्टरही शेअर केला होता. हा चित्रपट हिंदी आणि पंजाबी या दोन भाषांमध्ये येणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. याशिवाय अभिषेक अग्रवाल, अर्चना अग्रवाल, विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक असल्याचं समोर आलं होतं. काश्मीर फाईल्स हा चित्रपट हा न्यायाचा अधिकार तर डेल्ही फाईल्स हा चित्रपट जगण्याच्या अधिकाराबद्दल असल्याचं यात सांगण्यात आलं होतं.