बॉलिवूड चित्रपट 'द काश्मीर फाईल्स'(The Kashmir Files)ची सध्या सगळीकडे चर्चा आहे.. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यानंतर अश्रू अनावर झाले. या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. पीएम मोदींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच 'द काश्मीर फाइल्स'चे कौतुक केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चित्रपटाचे पाचव्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. त्यानंतर या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगितले आहे. पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत, 'द काश्मीर फाइल्स'ने सूर्यवंशी, गंगूबाई काठियावाडी, 83 यांना मागे टाकले आहे.
पाचव्या दिवशी कमवाले इतके कोटी'द काश्मीर फाइल्स'ने पाचव्या दिवशी 18 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने तानाजी आणि उरीलाही मागे टाकले आहे. या दोन्ही चित्रपटांनी पाचव्या दिवशीही 18 कोटींपेक्षा कमी व्यवसाय केला. तानाजीने 15.28 कोटींचा व्यवसाय केला आणि उरीने 9.57 कोटींचा गला जमावला होता.
काश्मीर फाइल्सने पहिल्या दिवशी 3.55 कोटी, दुसऱ्या दिवशी 8.50 कोटी, तिसऱ्या दिवशी 15.10 कोटी आणि चौथ्या दिवशी 15.05 कोटींचा बिझनेस केला. पाचव्या दिवसाच्या कलेक्शनचा समावेश करून या चित्रपटाने आतापर्यंत 60 कोटींचा गल्ला जमावला आहे.
द कश्मीर फाइल्स' चित्रपटाची निर्माती अभिषेक अग्रवाल आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.