Join us

The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'ची ऑस्कर्स 2023मध्ये एंट्री, अनुपम खेर बेस्ट अॅक्टर कॅटेगिरीत शॉर्टलिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 1:14 PM

The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'ने भारतातून ऑस्करसाठी निवडलेल्या 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे.

The Kashmir Files : 2022 मधील सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) बाबत एक  मोठी बातमी समोर आली आहे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाने थेट ऑस्कर 2023 मध्ये एंट्री घेतली असून, भारतातून ऑस्करसाठी निवडलेल्या 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ही बातमी ट्विटरवरुन शेअर केली आहे.

या कलाकारांची निवडविवेक अग्निहोत्रीने 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे आभार मानले. विशेष म्हणजे, द काश्मीर फाइल्स चित्रपटातील कलाकारांपैकी पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत निवडण्यात आले आहे. विवेक म्हणाले की, ही फक्त सुरुवात आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ काश्मीर फाइल्स हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावरुन बराच वादही झाला होता. राजकारण्यांनी काश्मीर फाइल्सवर निशाणा साधत, याला प्रोपगंडा फिल्मचा टॅग दिला. काश्मीर फाइल्स 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी दाखवतो.

या चित्रपटाने बराच वाद निर्माण केला असला तरी बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. द काश्मीर फाइल्स या लो बजेट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 15 कोटीमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने फक्त भारतातच 252 कोटी आणि जगभरात 341 कोटींचे कलेक्शन केले. काश्मीर फाइल्स 2022 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे.

इफ्फी प्रमुखांच्या वक्तव्याने वाद

गेल्या वर्षी गोव्यात आयोजित 53 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) ज्युरी प्रमुख नदव लॅपिड यांनी भर कार्यक्रमात द काश्मीर फाइल्सला अश्लील आणि प्रोपगंडा फिल्म म्हटले होते. नदव लॅपिडच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर द काश्मीर फाइल्सच्या संपूर्ण टीमने इस्रायली चित्रपट निर्मात्यावर जोरदार टीका केली होती.

टॅग्स :द काश्मीर फाइल्सऑस्करबॉलिवूड