'द केरळ स्टोरी'ने या वर्षातील निवडक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपले नाव नोंदवले आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. पण, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर देखील अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म, म्हणत टीका केली होती.
चित्रपट प्रदर्शित होऊन 15 दिवस उलटले आहेत. मात्र, थिएटरमध्ये अजूनही हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी होतेय. विकेंड सोडून दिवसातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांतच या चित्रपटाने 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी स्टारर चित्रपटाने 14 दिवसांत 171.72 कोटींचा बिझनेस केला आहे. दुसरीकडे, 15 व्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे तर चित्रपटाने शुक्रवारी 6 कोटींचा गल्ला जमावला आहे. आतापर्यंत चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 177.72 कोटींवर गेले आहे. आता हा चित्रपट हळूहळू 200 कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. या वीकेंडला चित्रपट काय कमाल दाखवू शकतो हे पाहावे लागेल.
सिनेमाची कथा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा ३ मुलींची कथा आहे. त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि धर्मबदल केला जातो. यानंतर त्यांना ISIS च्या हवाली केलं जातं. दरम्यान एक मुलगी निसटून भारतात येते आणि घडलेली सर्व घटना सांगते. त्या मुलीचं पात्र अभिनेत्री अदा शर्माने साकारलं आहे. तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक होतंय.