अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट वादांच्या भोवऱ्यात असूनही बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने यापूर्वीच १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सध्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील कमाईत दिवसेंदिवस वाढत होते आहे. 'द केरळ स्टोरी'ने रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी कितीचा बिझनेस केला आहे ते येथे जाणून घेऊया.
११व्या दिवशी किती केली कमाई?'द केरळ स्टोरी'ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली होती. जिथे एकीकडे काही राजकीय पक्षांनी चित्रपटाला विरोधत दर्शवत बंदीची मागणी केली होती, तर दुसरीकडे प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. चित्रपटाच्या कलेक्शनमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. 10व्या दिवशी चित्रपटाने 23.75 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले होते. आता रिलीजच्या 11व्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या 11व्या दिवसाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, सोमवारी म्हणजेच 11व्या दिवशी 'द केरळ स्टोरी'ने 10.30 कोटींची कमाई केली आहे.. यासह 'द केरळ स्टोरी'ची एकूण कमाई आता 147.04 कोटी रुपयांवर गेली आहे.
'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 9 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. यासोबतच हा चित्रपट 150 कोटींचा जादुई आकडा पार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. मंगळवारी हा चित्रपट 150 कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे.