'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) ला रिलीजपूर्वी आणि नंतरही अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती. असे असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने चांगला बिझनेस केला आहे. चित्रपटाने 9व्या दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि 'द केरळ स्टोरी'ने रिलीजच्या 12व्या दिवशी 150 कोटींचा आकडाही पार केला आहे. यासह हा चित्रपट 2023 सालचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज कोटींची कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस झाले आहेत आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे चित्रपट चांगला गल्ला जमावतो आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या आकडेवारीनुसार, 'द केरळ स्टोरी'ने 12 व्या दिवशी 9.80 कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. चित्रपटाची एकूण कमाई आता 156.84 कोटींवर गेली आहे. यासोबतच 'द केरळ स्टोरी'नेही 150 कोटींचा आकडा ही पार केला आहे.
'द केरळ स्टोरी' 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाची कमाई ज्या गतीने होत आहे ते पाहता या वीकेंडपर्यंत 200 कोटी क्लबमध्ये सामील होण्याची आशा निर्मात्यांना आहे. 'द केरळ स्टोरी' हा 2023 मधील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'द केरळ स्टोरी'च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.