'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमाचा सध्या चर्चेत आहे. केरळच्या हजारो मुली लव्हजिहादला बळी पडून ISIS ला सामील होतात अशा सत्यघटनेवर कथा आधारित आहे. अनेकांनी हा चित्रपट प्रोपोगंडा असल्याचा आरोप केला. ४० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत १५० कोटींचा टप्पा सहज पार केला. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही होत आहे.
अदा २००८ साली विक्रम भट्ट यांच्या '1920' या सिनेमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती काही मोजक्या सिनेमांमध्ये झळकली. परंतु, तिला खरी ओळख द केरळ स्टोरीमुळे मिळतीये असं म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर अदाच्या नावाची चर्चा होताना दिसतीये.
हिंदी सह अदाने तेलुगू आणि तामिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे साऊथमध्येही तिची क्रेझ आहे. अदाने केवळ १२ वी पर्यंत तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली. अदा १० वीत असतानाच तिने अभिनेत्री होण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार, तिने या क्षेत्रात पदार्पणही केलं.
'द केरळ स्टोरी' प्रदर्शित झाल्यापासून अदा सातत्याने चर्चेत येत आहे. यात तिच्या प्रॉपर्टी, लाइफस्टाइलची चर्चा होतीये. इतकंच नाही तर आता तिने या सिनेमात काम करण्यासाठी किती मानधन घेतलं हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना आहे. बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड मोडणाऱ्या 'द केरळ स्टोरी' सिनेमात काम करण्यासाठी अदाने तब्बल एक कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.