निर्माते विपुल शहा यांचा 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमा सुपरहिट ठरला आहे. चार आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत चित्रपटाची कमाई ही २०० कोटींच्या पार गेली आहे. आता सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांमध्ये प्रतिक्षा आहे. याविषयीच आता माहिती समोर आली आहे.
माध्यम रिपोर्टनुसार 'द केरळ स्टोरी' चे डिजीटल अधिकार झी5 (Zee5)ने घेतले आहेत. ही ब्लॉकबस्टर फिल्म पुढील महिन्यात ओटीटीवर येईल अशी अपेक्षा आहे. अद्याप ओटीटी रिलीज डेट समोर आलेली नाही आणि मेकर्सकडूनही रिलीजबाबत काही अधिकृत माहिती समजलेली नाही. 'द केरळ स्टोरी' सिनेमाने चारच आठवड्यात २०४ कोटींचा गल्ला जमवला आहे. अनेक ठिकाणी विरोध असतानाही प्रेक्षकांनी सिनेमाला तुफान प्रतिसाद दिलाय.
'द केरळ स्टोरी' सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हाच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. यानंतर सिनेमा जगभरात रिलीज झाला. ही फिल्म प्रोपोगंडा आहे अशी टीका झाली. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू मध्ये सिनेमावर बंदी घालण्यात आली. अशा परिस्थितीतही प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला. केरळमधील हजारो महिला लव्हजिहादच्या शिकार झाल्या आणि परिणामी ISIS च्या मध्ये सामील झाल्या. तिथे त्यांच्यासोबत काय छळ झाला अशा महिलांची की कहाणी आहे जी सत्यघटनेवर आधारित आहे.