The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे, त्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेमुळे बराच वाद निर्माण झाला होता. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती, पण अखेर तो प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनीही याला डोक्यावर घेतले.
9 दिवसात 100 कोटी पार...
रिपोर्टनुसार, 13 मे 2023 रोजी म्हणजेच रिलीजच्या नवव्या दिवशी 'द केरळ स्टोरी' ने 19.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दिवसाच्या कलेक्शनसह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 112.99 कोटी रुपये झाले आहे. या आकडेवारीसह, हा चित्रपट या वर्षातील चौथा चित्रपट आहे, जो 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या यादीत 'पठाण', 'तू झुठी में मक्का' आणि 'किसी का भाई किसी की जान'चा समावेश आहे. चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बॉक्स ऑफिसवर 'द केरळ स्टोरी'ची त्सुनामीचित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श सांगतात की, रविवारी म्हणजेच आज 14 मे 2023 रोजी चित्रपट आणखी चांगला परफॉर्म करणार आहे, त्यामुळे कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा मोठी उडी पाहायला मिळणार आहे. भारतात रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यानंतर, हा चित्रपट यूएस आणि कॅनडामध्येही प्रदर्शित झाला आहे आणि तेथे तो 200 हून अधिक स्क्रीनवर दाखवला जात आहे. अनेक लोक या चित्रपटाची 'द काश्मीर फाइल्स'शी तुलना करत आहेत.