Join us

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवीन एण्ट्री, शेफाली समीरच्या नात्यात येणार दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 7:15 PM

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.

माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. आता या मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. ती म्हणजे समीरची बहिण. तिच्या एन्ट्रीमुळे मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

नेहा अपघातात गेली असा समज आता सगळ्यांनी करून घेतला आहे. मात्र नुकतेच समीर आणि शेफाली डेट करण्यासाठी एका कॅफेमध्ये बसलेले असतात. त्यावेळी कॅफेच्या दाराबाहेर समीरला नेहा दिसते. अर्थात नेहाची आता स्मृती गेली असल्याने ती अनुष्का म्हणून वावरताना दिसत आहे. नेहाला समोर पाहून समीर मात्र पुरता गोंधळून जातो आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या मागोमाग जातो. इकडे शेफाली देखील समीरच्या अचानक जाण्याने गोंधळून जाते. मात्र समीरच्या फोनवर त्याच्या बहिणीचा फोन येतो आणि शेफाली तो कॉल घेते. या दोघींची भेट होते त्यावेळी शेफाली तिच्या आणि समीरच्या नात्याचा खुलासा करते. मात्र समीरची बहीण यावर नाराज होते आणि शेफालीने समीरला आपल्या जाळ्यात ओढले आहे, असे म्हणत ती शेफालीला धारेवर धरते. समीरच्या बहिणीची मालिकेत एंट्री झाल्याने समीर आणि शेफालीच्या नात्यात दुरावा येणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. माझ्या बहिणीला आपल्या नात्याबद्दल काहीच माहिती नाही, त्यामुळे ती तुझ्यावर चिडली अशी शेफालीची समजूत घालताना दिसतो. मात्र यावेळी तो शेफालीला नेहा दिसली असेही आवर्जून सांगतो. अर्थात ती नेहा होती की दुसरी कोणी यावर तो प्रश्न उपस्थित करतो. मात्र या ट्विस्टमुळे नेहा मालिकेत परतण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 

समीरच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री योगिनी पोफळे हिने साकारली आहे. योगिनी ही मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेत्री आहे. चित्रपट आणि मालिकेत काम करण्यापेक्षा तिला रंगभूमीवर काम करायला खूप आवडते. नाटक ही तिची पहिली पसंती आहे. लागीरं झालं जी या मालिकेत योगिनीने भैय्या साहबाच्या बहिणीची भूमिका निभावली होती. या मालिकेत एकत्रित काम करताना हे दोन्ही पात्र प्रत्यक्षात देखील भावा बहिणीचे हे नातं टिकवून ठेवताना दिसली आहेत.

लागीरं झालं जी मालिकेमुळे योगिनीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. उबंटू, वेडिंगचा सिनेमा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, हसवा फसवी, हसगत, गाईच्या शापानं अशा माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नकाब या सीरिजमध्ये मल्लिका शेरावत हिच्या भूमिकेला योगीनीने आवाज दिला आहे. कुलस्वामिनी हा तिचा महत्वाची भूमिका असलेला आगामी चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :झी मराठी