Join us

'द रॉयल्स'मध्ये पाहायला मिळणार जुन्या राजघराण्यांचा रोमान्स, दिसणार हे प्रसिद्ध कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 15:29 IST

The Royals : 'द रॉयल्स' या थ्रिलर वेब सीरिजमध्ये अनेक सेलिब्रिटी दिसणार आहेत. नुकतीच या सीरिजची झलक पाहायला मिळाली आहे.

झीनत अमान, साक्षी तन्वर, नोरा फतेही, चंकी पांडे, दिनो मोरिया आणि मिलिंद सोमण यांसारखे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आगामी रोमँटिक मालिका 'द रॉयल्स'मध्ये अभिनेता इशान खट्टर आणि भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहेत. सीरिजच्या निर्मात्यांनी १४ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर टीझर शेअर केला होता, ज्यामध्ये ईशान शाही अंदाजात दिसत आहे. यानंतर, टीझरमध्ये ईशान आणि भूमी यांच्यातील शाही रोमान्स दाखवण्यात आला आहे.

नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत अकाउंटवर शोची पहिली झलक शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुमच्या डोळ्यांसाठी एक शाही मेजवानी, द रॉयल्सची घोषणा करत आहे, लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर येत आहे'. या मालिकेत ईशान खट्टर, भूमी पेडणेकर, झीनत अमान, साक्षी तन्वर, नोरा फतेही, मिलिंद, दिनो मोरिया, चंकी पांडे, विहान सामत असे स्टार्स दिसणार आहेत. 

या सीरिजबद्दल प्रितिश नंदी म्हणाले, “द रॉयल्स ही आमची Netflix सोबतची पहिली मालिका आहे, जी आगामी भारतीय पिढीची कथा आणि गंमत यावर भाष्य करते. त्यात जुन्या राजघराण्यांच्या आणि आजच्या स्टार्टअप वॉरियर्सच्या रोमांसच्या कथा आहेत.” या सीरिजमध्ये प्रियांका घोष आणि नुपूर अस्थाना दिग्दर्शित, या मालिकेत विहान सामत, काव्या त्रेहान, सुमुखी सुरेश, उदित अरोरा, लिसा मिश्रा आणि ल्यूक केनी यांच्याही भूमिका आहेत.

टॅग्स :झीनत अमानइशान खट्टरभूमी पेडणेकर नोरा फतेही