Join us

‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका आता नवीन वेळेत! ‘झी मराठी’वर होणार मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 12:24 IST

‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. 

 सतत नाविन्यपूर्ण मनोरंजनाने जगभरातील मराठी प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीने भुरळ पाडली आहे. विविध कार्यक्रम आणि मालिकांमधून झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक नेहमीच भागवली आहे. झी मराठीवरील मालिका घराघरांत पाहिल्या जातात. ‘सारं काही तिच्यासाठी’ (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका याचं उत्तम उदाहरण! या मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली होती. आता या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. 

झी मराठी वाहिनीवर २१ ऑगस्ट २०२३ पासून  ‘सारं काही तिच्यासाठी’  ही मालिका सुरू झाली होती. सुरूवातीला ही मालिका रात्री ७.३० वाजता प्रसारित केली जायची. आता काही महिन्यांमध्येच या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. वाहिनीने १२ फेब्रुवारीपासून २०२४ पासून या मालिकेची वेळ बदलली असून सोम ते शनि रात्री ८.३० अशी केली.  झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे. 

नव्या वेळेत मालिकेची हीच पकड आता अधिक घट्ट होईल, अशी आशा मालिकेची टीम व्यक्त करत आहे. मालिकेने जरी वेळ बदलली असली तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा हा खुराक कधीही कमी होणार नाही, याची झी मराठीने पुरेपूर काळजी घेतली आहे. 'सारं काही तिच्यासाठी'  या मालिकेमध्ये  खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत, अशोक शिंदे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेने विविध पुरस्कारांवर नाव कोरले.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेताझी मराठीअशोक शिंदे