Join us

'गुलाबी साडी' गाण्यानं नेहा खानला घातली भुरळ, गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 16:10 IST

Neha Khan : सध्या सोशल मीडियावर संजू राठोड आणि प्राजक्ता घाग यांचे गुलाबी साडी हे गाणे चांगलेच ट्रेंड होताना दिसत आहे. दरम्यान आता अभिनेत्री नेहा खानदेखील या गाण्यावर थिरकली असून तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील नवनवीन व्हिडीओ आणि गाणी व्हायरल होत असतात. सध्या संजू राठोड आणि प्राजक्ता घाग यांचे 'गुलाबी साडी' (Gulabi Saree) हे गाणे चांगलेच ट्रेंड होताना दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या गाण्यावर व्हिडीओ रिल्स बनवताना दिसत आहे. तसेच या गाण्यावर रिल्स बनवत आहेत. दरम्यान आता अभिनेत्री नेहा खान(Neha Khan)देखील या गाण्यावर थिरकली असून तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

अभिनेत्री नेहा खान हिने इंस्टाग्रामवर गुलाबी साडीत व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती गुलाबी साडी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, डिमांड असल्यामुळे गुलाबी साडी. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

नेहा खानने मराठी कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केले आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. शिकारी चित्रपटानंतर ती 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली. याव्यतिरिक्त ती झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये सहभागी झाली होती. त्यात तिने नृत्याची झलक दाखवली होती. तसेच ती देवमाणूस २ मालिकेतही पाहायला मिळाली.

टॅग्स :नेहा खान