Join us

'झनक' मालिकेत पाहायला मिळणार एका महत्त्वकांक्षी तरुणीची कथा, प्रोमोनं वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 17:06 IST

Jhanak : स्टार प्लस वाहिनीवरील नवी मालिका 'झनक'चा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील नवी मालिका झनक ज्यात आशा आणि स्वप्ने बाळगणाऱ्या एका महत्त्वकांक्षी तरुणीची कथा चित्रित करण्यात आली आहे. तिच्या आयुष्यात अनपेक्षित उद्भवलेली परिस्थिती पाहताना प्रेक्षक निश्चितच या कथेत गुंतत जातील. मालिकेतील ‘झनक’ ही मुख्य व्यक्तिरेखा हिबा नवाब हिने साकारली असून क्रिशल आहुजा या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहे. अलीकडेच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. 

एका वंचित पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आयुष्यातील संघर्ष करणाऱ्या मुलीचा प्रवास या प्रोमोमध्ये प्रेक्षकांसमोर उलगडत जातो. झनक तिच्या दैनंदिन आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना कशी नेटाने करते, याची झलक या ‘प्रोमो’त बघायला मिळते. मात्र, तिच्या कुटुंबावर अचानक झालेल्या आघाताने तिचे जग पार बदलून जाते. याच वेळी झनकला मदतीचा हात देणाऱ्या अनिरुद्धचा या मालिकेत प्रवेश होतो. कितीतरी वेळा झनक आणि अनिरुद्ध परस्परांच्या समोर येतात, पण त्यांची भेट होत नाही. मात्र, नशीब पुन्हा या दोघांना एकाच घरात एकत्र आणते. 

वंचित पार्श्वभूमीतून आलेली असूनही झनक तिच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी कशी उभी राहते आणि तिचे प्रेम तिचा स्वीकार करते का? या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिका पुढे सरकेल, तशी मिळत जातील. झनकची कथा प्रेक्षकांकरता भावनेने ओथंबलेली असंख्य वळणे घेणारी ‘रोलरकोस्टर’ सफर आहे आणि झनक एका फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून पुन्हा जन्म कसा घेते, याचे साक्षीदार प्रेक्षकांना होता येईल.

टॅग्स :स्टार प्लस