Join us

स्टार अभिनेत्रीच्या डिलीव्हरीसाठी सुपरस्टार पतीने केलं होतं अख्खं रुग्णालय बुक, वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 19:16 IST

९० च्या दशकातील या सुपरस्टार कपलची गोष्ट

धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. धर्मेंद्र विवाहित असतानाही हेमा मालिनींच्या प्रेमात पडले होते. तर हेमा मालिनी यांनाही हँडसम धर्मेंद्र यांच्या चार्मने भुरळ घातली होती. धर्मेंद्र पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकणार नव्हते. म्हणून त्यांनी धर्मपरिवर्तन करत हेमा मालिनी यांच्याशीही लग्न केलं. गेल्या ४० वर्षांपासून दोघंही सुखाचा संसार करत आहेत. त्यांना ईशा आणि आहाना या मुलीही झाल्या. हेमा मालिनी गरोदर असतानाचा एक किस्सा वाचा.

हेमा मालिनी यांची निकटवर्तीय नीतू कोहली एकदा म्हणाल्या होत्या की, "ईशा देओलच्या जन्माच्या वेळी धर्मेंद्र यांनी रुग्णालयातील सगळ्या खोल्याच बुक केल्या होत्या. 1980 साली धर्मेंद्र आणि हेमा गुपचूप लग्नबंधनात अडकले. तर 1981 साली ईशाचा जन्म झाला. जेव्हा हेमा मालिनी गरोदर होत्या तेव्हा ही गोष्ट त्यांचं कुटुंबीय, मित्रपरिवार कोणालाच माहित नव्हती. धर्मेंद्र यांनी अख्खं रुग्णालयच बुक केलं जेणेकरुन हेमा मालिनी यांची कोणतीही गैरसोय होणार नाही."

त्या पुढे म्हणाल्या, "ते १०० खोल्या असलेलं नर्सिंग होम होतं. हेमा मालिनी यांच्या डिलीव्हरीबाबत कोणालाही कळू द्यायचं नसल्याने सगळ्या खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. यासाठी त्यांनी कित्येक कोटी रुपये खर्च केले. ईशाच्या जन्मानंतर धर्मेंद्र खूप खूश होते."a

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्रबॉलिवूडप्रेग्नंसी