Join us

'मुंबई डायरीज २'चा टीझर रिलीज, या दिवशी ओटीटीवर येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 4:50 PM

Mumbai Diaries 2 : 'मुंबई डायरीज'मध्ये मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची कथा दाखवण्यात आली होती.

OTT प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ लवकरच मुंबई डायरीज (Mumbai Diaries 2) हिट वेब सिरीजचा पुढचा सीझन घेऊन येत आहे. या मालिकेचा पहिला भाग २०२१ मध्ये आला होता. ज्यामध्ये मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची कथा दाखवण्यात आली होती. यावेळीही मुंबईशी निगडित एक गंभीर विषय असणार आहे. मुंबई डायरीज’च्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियर डेटची घोषणा करण्यात आली. या दुसऱ्या सीझनचा प्रीमियर ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतरचे पडसाद झेलणारे बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे डॉक्टर, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी वर्ग वैयक्तिक संघर्षांना सामोरा जातो. त्यातच मुंबईच्या पुराचा विद्ध्वंस उदभवतो. मानवी मनाचा पट अत्यंत बारकाईने उलगडताना चिवट वृत्ती आणि सगळ्या विचित्र पार्श्वभूमीवर जगण्याची झुंज असलेले ताकदीचे कथानक पुढे येते. मांडणी आणि दिग्दर्शन निखिल अडवाणी  याचे आहे तर या वैद्यकीय नाट्याची निर्मिती एम्मे एंटरटेनमेंट’च्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजानी यांनी केली आहे. या मालिकेत अगोदरच्या सीझनमधील चतुरस्त्र कलाकार झळकणार असून त्यात कोंकणा सेन शर्मा,  मोहित रैना, टीना देसाई,  श्रेया धन्वंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलवडी यांचा समावेश आहे. 

मुंबई डायरीज हे वैद्यकीय नाट्य गहन आहे, आपले फ्रंटलाईन कर्मचारी आणि मेडिकल विश्वातील हिरो ज्या अनुभव आणि सफलतेतून गेले, त्या कथांचा परामर्श घेण्याचा आहे. मुंबई डायरीज २६/११ ने मिळवलेलं प्रचंड प्रेम आणि प्रशंसेनंतर, आम्ही या सीझनमध्ये आमच्या नायकांच्या कक्षा वाढवल्या आहेत. कारण त्यांना आव्हानांचा सामना करावा लागला. ज्यामुळे त्यांचा सर्व आघाड्यांवर कस लागला,” निर्माता आणि दिग्दर्शक, निखिल अडवाणी म्हणाले. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेकोंकणा सेन शर्मा