Join us  

रंगभूमी हाच माझा श्वास

By admin | Published: January 13, 2017 5:38 AM

अभिनेता रजत कपूर याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूडला

- Benzeer Jamadar - अभिनेता रजत कपूर याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूडला कपूर अँड सन्स, दृष्यम, एजंट विनोद, भेजा फ्राय असे अनेक चित्रपट दिले आहेत. आपल्या यशस्वी वाटचालीविषयी या अभिनत्याने लोकमत सीएनएक्ससोबत साधलेला खास संवाद...तू अनेक नाटक आणि बॉलिवूड चित्रपट केले आहेत. तुझ्यासाठी सगळ््यात जवळचे माध्यम कोणते?- खरं सांगू का, रंगभूमी हेच माध्यम माझ्या अगदी जवळचे आहे. या रंगभूमीवर प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो. कॅमेऱ्यासारखा येथे रिव्हर्स हा प्रकार नसतो. येथे पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते. जे थ्रील यामध्ये आहे, ते इतर कोणत्याही माध्यमात नाही. नाटकाच्या तालमीच्या वेळी येथे प्रत्येक गोष्ट शेअर होते. या वेळी अनेक लोकांना भेटण्याची संधीही मिळते. त्याचबरोबर ओळखीही वाढतात. तसेच या वेळी इतरांचे मार्गदर्शन लाभते. त्यामुळे या गोष्टींचा खूप फायदा होतो.नाटक हिंदी असो वा मराठी. तुझे रंगभूमीविषयी काय मत आहे?- प्रत्येक कलाकारासाठी रंगभूमी हे जीवन असते. नाटक हे आमच्या रक्तात आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मी रंगभूमीवर काम करतोय. नाटक ही केवळ आमची रोजीरोटीच नाही तर आमचा श्वास आहे. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना काय कानमंत्र देशील?- या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना एवढेच सांगेन, की फक्त ग्लॅमर म्हणून या क्षेत्राकडे पाहू नका. कष्ट करण्याची तयारी ठेवा. त्याचबरोबर या क्षेत्रात येण्यापूर्वी रंगमंच्याचा अभ्यास करणे आवश्यक गोष्ट आहे. तसेच एक कलाकार म्हणून येथे जे समाधान मिळते ते इतर कोणत्याही माध्यमात मिळत नाही.मराठी चित्रपटात काम करण्यास आवडेल का?- हो, मला मराठी चित्रपटाची आॅफर आली तर नक्कीच मी काम करेन. त्यासाठी चांगली भूमिका आणि कथा आवश्यक आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत मराठी चित्रपटाने भरारी घेतली आहे. मराठीत सक्षम कथा असणारे चित्रपट पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मराठी चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्गदेखील मोठा आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर खूपच आनंद होईल. सैराट, श्वास यांसारखे चित्रपट खरेच मराठी चित्रपटसृष्टीची शान आहेत. तुझे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत?- सध्या माझ्याकडे दोन ते तीन प्रोजेक्ट आहेत. तसेच यावर्षी आमच्या थिएटर कंपनीला २५ वर्षे होत आहेत. त्यामुळे हे वर्ष आमच्यासाठी खूपच खास आहे. यंदा या रौप्यमहोत्सवानिमित्त आमच्या नाटक कंपनीने जी नाटके गेल्या२५ वर्षांत केली आहेत, ती यानिमित्ताने पुन्हा सादर करणार आहोत.