Join us

...तर अभिजीतला नपूंसक केले असते - ऋषी कपूर बरसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2015 9:47 AM

हिट अँड रनप्रकरणात पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर सलमान खानला बॉलीवूडकडून पाठिंबा मिळत असतानाच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्याच्या समर्थकांना फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ७ - हिट अँड रनप्रकरणात पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर सलमान खानला बॉलीवूडकडून पाठिंबा मिळत असतानाच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्याच्या समर्थकांना फटकारले आहे. एखाद्या दिवशी हुकूमशहा होता आले असते तर गायक अभिजीतला नपूंसक बनवले असे वादग्रस्त मत ऋषी कपूर यांनी मांडले आहे. 

सलमान खानच्या शिक्षेचा निकाल येताच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सलमानला पाठिंबा दर्शवला. मात्र सलमानला पाठिंबा देण्याच्या नादात गायक अभिजीत यांचा तोल गेला व त्यांनी कुत्रे रस्त्यावर झोपले तर ते मरणारंच असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरुन टीका होताच अभिजीत यांनी माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सलमानला पाठिंबा देणा-यांवर चांगलेच नाराज झाल्याचे दिसते. गुरुवारी रात्री ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे सलमानच्या समर्थकांना खडेबोल सुनावले आङे. मीदेखील सलमानचा शुभचिंतक आहे, पण या प्रकरणात तुम्ही तर्कसंगत मत मांडायला हवे असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे. सलमानचा चमचा होण्यासाठी काही जण हा खटाटोप करत आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.