Join us

"ढोंग घेण्याला पण मर्यादा असते", शीतल म्हात्रेंना चित्रा वाघ यांची साद अन् उर्फीनं केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 4:57 PM

एकीकडे चित्रा वाघ यांचा शीतल म्हात्रेंना पाठिंबा तर दुसरीकडे उर्फी जावेदने चित्रा वाघ यांनाच सुनावलं

शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन सध्या राजकारण तापलेले आहे. आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शीतल म्हात्रेंना पाठिंबा देत ट्वीट केले आहे. मात्र त्यांच्या या ट्वीटवरुन सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने (Urfi Javed) पुन्हा जुना वाद उकरुन काढला आहे.

चित्रा वाघ यांचे ट्वीट

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रे यांना साद घालत तू लढ असं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले, ''शीतल तू लढ, आम्ही तुझ्यासोबत आहोत. हा विषय फक्त शीतल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील मुंबई पोलिसांना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा" असं म्हटलं आहे. 

झालं तर मग चित्रा वाघ यांच्या या भूमिकेवरुन तिकडे उर्फी जावेदचा मात्र संताप झाला आहे. उर्फीला तिच्या कपड्यांवरुन बोलणाऱ्या चित्रा वाघ आता शीतल म्हात्रे यांच्यामागे उभ्या आहेत. त्यांच्या या भूमिकेवर टीका करत उर्फी म्हणाली, 'स्वत: ती वेळ विसरली का जेव्हा माझ्या कपड्यांवरुन माझ्याकडे बोट दाखवत होती. मला जेलमध्ये पाठवण्याची मागणी करत होती. खुलेआम माझं डोकं फोडायची धमकी देत होती. वाह वाह वाह वाह. ढोंगीपणाला सुद्धा मर्यादा असते हे कोणी या बाईला सांगा.'

उर्फीच्या या ट्वीटनंतर आता चित्रा वाघ यांच्यासोबतचा तिचा वाद पुन्हा डोकं वर काढतो का असंच चित्र दिसतंय. उर्फीच्या ट्वीटवर आता चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतात हे बघावं लागेल.

उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद नेमका काय ?

उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात काही दिवसांपूर्वीच वाद पेटला होता. उर्फी ज्या पद्धतीने विचित्र कपडे घालते आणि रस्त्यावर फिरते यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. या महिलेला तुरुंगात पाठवा अशी मागणी देखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. हा वाद इतका विकोपाला गेला की महिला आयोगाला याची दखल घ्यावी लागली होती. उर्फीने महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र नंतर हा वाद निवळला. 

टॅग्स :उर्फी जावेदचित्रा वाघभाजपासोशल मीडियाट्रोल