ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - खान तिकडी असो की खिलाडी, सिंघम असो यांना आपल्या कार्किर्दीच्या सुरुवातीला स्ट्रगल आणि अपयशाचा सामना करावाच लागला आहे. नव्या दमाच्या अभिनेत्यांचा विचार केल्यास रणबीर ते रणवीर आणि सुशांत ते अर्जुन कपूर यांनाही अपयशचा सामना करावा लागला आहे. पण 2012 मध्ये स्टुडेंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या वरुण धवनने पाच वर्षात एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही. या पाच वर्षात वरुन धवण आठ चित्रपट केले असून यातील 3 शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामिल आहेत.डेविड धवनचा मुलगा म्हणून चित्रनगरीत पदार्पन करणाऱ्या वरुणच्या सर्वच चित्रपटाने तिकीट खिडकीवर भरघोस यश मिळवले आहे. नुकताच होळीच्या मुहर्तावर रिलिज झालेला बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सध्या धूम उडवून दिली आहे. या चित्रपटाने जगभरात 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करत या वर्षीच्या हीट चित्रपटाच्या यादीत प्रवेश केला आहे. भारतीय तिकीट खिडकीवर बद्रीनाथ की दुल्हनियाने आतापर्यंत 93 कोंटीचा व्यवसाय केला आहे. बॉक्स ऑफिसवरील सध्याची स्थिती पाहता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणार यात काही दुमत नाहीये. आलिया भट्ट वरुनसाठी सर्वात लकी अभिनेत्री आहे. पाच वर्षा आलियासोबत वरुन धवनने तीन चित्रपट केले आहेत. या तिन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळवले आहे. स्टुडेंट ऑफ द इयरने 70 करोड रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर हम्टी शर्मा की दुल्हनियाने 77 करोड रुपयांचा गल्ला जमवला आहे. निर्मीती खर्चा पेक्षा ही कमाई जास्त आहे. वरुण धनवचे चित्रपट स्टुडेंट ऑफ द इयर - 70 करोडशर्मा की दुल्हनिया - 77 करोडबद्रीनाथ की दुल्हनिया - 100 करोड मैं तेरा हिरो - 55 करोडबदलापूर - 53 करोडएबीसीडी 2 - 107 करोडदिलवाले - 148 करोड
पाच वर्षात एकही फ्लॉप नाही, हा आहे बॉलिवूडचा नवा सुपरस्टार
By admin | Published: March 20, 2017 7:33 PM