अभिनेत्री तब्बूने आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. एक संवेदनशील अभिनेत्री आणि कोणत्याही भूमिकेला तितक्याच ताकदीने साकारणारी अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावले आहे. मात्र वयाच्या 47 वर्षांनंतरही तब्बू अविवाहित आहे. या वयातही तब्बूचे सौंदर्य आबाधीत आहे.
आजही ती पूर्वीइतकीच सुंदर दिसते. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन आजही तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होतात. ऑनस्क्रीन आकर्षक पेहरावाने तिच्या सौंदर्यात आणखीन चारचाँद लागायचे. कलाकार ऑनस्क्रीन आकर्षक दिसावे पडद्यामागे अनेक कालाकारांची फौज काम करत असते. त्यापैकी एक होता सिंघम दिग्दर्शक रोहित शेट्टी.
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या रोहितनं स्वत:सोबत अनेक कलाकारांची ओळख निर्माण केली आहे. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमाचं दिग्दर्शन केलेल्या रोहितचा इथवरचा प्रवासही तितका सोपा नव्हता. कामासाठी स्ट्रगल करावे लागणारे अनेक कलाकार पाहायला मिळतील. त्यापैकीच रोहित शेट्टीदेखील होता.
एकेकाळी रोहित शेट्टी पडद्यामागे राहून काम करायाचा.तब्बू पासून ते अनेक अभिनेत्रींच्या साड्यांना इस्त्री करण्याचे काम रोहित शेट्टी करायचा. 1995 मध्ये तब्बूचा “हकिकत” सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमात तब्बू प्रमुख भूमिकेत होती. त्या दरम्यान रोहित शेट्टीने अभिनेत्री तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्याचे काम केले आहे. त्यामुळे संघर्षहा रोहित शेट्टीलाही चुकला नाही.
आज शाहरुख पासून ते सलमानपर्यंत सारेच बडे बडे कलाकार रोहित शेट्टीच्या सिनेमात काम करण्याची इच्छा बाळगतात. कधीकाळी कामासाठी इतरांच्या मागे फिरणारा रोहित शेट्टी आज सर्वात यशस्वी दिग्दर्शकाच्या यादीत गणला जातो. आज प्रचंड यशस्वी असला तरीही त्यालाही सुरुवातील प्रचंड संघर्ष करावा लागला आहे.
कधी कलाकारांच्या कपड्यांना इस्त्री करण्यापासून ते शूटिंगच्या सेटवर स्पॉटबॉयचेही काम त्याने केले आहे. सुरुवातीपासून कोणतेही काम करण्यात त्याला कमीपणा वाटला नाही. कदाचित कामाप्रती त्याची मेहनत, जिद्द आणि प्रतिष्ठा यामुळेच आज त्याचे जगभरात चाहते आहेत. 'रोहित शेट्टी बस नाम ही काफी है ' अशी त्याची आज ओळख बनली आहे.
असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या रोहितनं पुढे स्वतंत्र चित्रपटांची निर्मिती केली. ‘जमीन’, ‘गोलमाल’, ‘संडे’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘ऑल द बेस्टः फन बिगिन्स’, ‘गोलमाल 3’, ‘सिंगमट, टबोल बच्चन’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘सिंगम रिटर्न्स’ यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमांची त्याने निर्माती केली आहे.