Join us

हे आहेत बॉलिवूड सिनेमांचे सर्वात महागडे आणि आलिशान सेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 4:07 PM

हे सेट बनवण्यासाठी किती खर्च केला गेला असेल याचा विचारही कुणी करत नसेल. चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या अशाच काही सिनेमांच्या सेट्सबाबत....

(Main Image Credit: FilmFare)

जेव्हाही बॉलिवूडचा विषय निघतो तेव्हा सिनेमातील गाणी, अॅक्शन, डान्स आणि कलाकार हे लक्षात येतात. यासोबतच आणखी एक गोष्ट सर्वात जास्त लक्षात राहते ती त्या त्या सिनेमांचे सेट्स. काही सिनेमांचे भव्यदिव्य सेट्स डोळ्यांचं पारणं फेडतात. पण हे सेट बनवण्यासाठी किती खर्च केला गेला असेल याचा विचारही कुणी करत नसेल. चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या अशाच काही सिनेमांच्या सेट्सबाबत....

'मुगले आजम' चा शिशमहल

1960 मध्ये आलेल्या या सिनेमाच्या सेट्सची त्या काळात फारच चर्चा झाली होती. मुगले आजम मधील प्यार किया तो डरना क्या या गाण्यासाठी लाहोरमधील शिशमहल किल्ल्याचा हुबेहुब सेट उभारण्यात आला होता. शिशमहलचा सेट उभारण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला होता. हा त्यावेळचा भारतातील सर्वात महागडा सेट होता. हा सेट तयार करण्यासाठी त्यावेळी 15 लाख रुपये खर्च आला होता. 

'देवदास'मधील चंद्रमुखीचा कोठा

दिग्दर्शक संजय लीला भन्साली हे त्यांच्या सिनेमांच्या भव्यदिव्य सेट्ससाठी चांगलेच प्रसिद्ध आहे. देवदास या सिनेमाच्या सेटसाठी संजय लीला भन्साली यांनी 20 कोटी रुपये खर्च केले होते. तर चंद्रमुखीच्या सेटसाठी त्यांनी 12 कोटी रुपये खर्च केले होते. 

सावंरिया

भन्साली यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. पण या सिनेमाच्या महागड्या सेटसाठी हा सिनेमा चांगलाग चर्चेत आला होता. या सिनेमाच्या सेटसाठी करोंडो रुपये खर्च करण्यात आला होता. 

गोलियों की रासलीला- रामलीला

संजय लीला भन्साली यांच्या गोलियों की रासलीला- रामलीला या सिनेमाचीही चर्चा झाली होती. या सिनेमाच्या सेटसाठीही भन्साली यांनी करोडों रुपये खर्च केले होते. 

बॉम्बे वेलवेट

अनुराग कश्यपचा बॉम्बे वेलवेट हा सिनेमा 60च्या दशकातील कथेवर होता आणि तशाच लुक देण्यासाठी कश्यपने खूप मेहनत घेतली होती. या सिनेमाचा सेट तयार करण्यासाठी 11 महिने लागले होते. त्याने कोलंबोमध्ये या सिनेमाचा सेट 9.5 एकरात तयार केला होता. 

'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत'

संजय लीला भन्साली यांच्या या दोन्ही सिनेमांसाठी भव्यदिव्य सेट उभारण्यात आले होते. बाजीराव मस्तानीमध्ये आइना महल उभारण्यासाठी 20 हजार डिझाईन केलेल्या आरशांचा वापर केला होता. तर पद्मावतसाठी भन्साली यांनी थेट चित्तोडचा किल्लाच उभारला होता.

प्रेम रतन धन पायो

सलमान खानच्या या फॅमिली ड्रामा सिनेमासाठीही सूरज बडजात्या यांनी भव्य सेट उभारले होते. त्यांनी एक रॉयल पॅलेस उभारला होता ज्यात राजस्थानचे ऐतिहासिक किल्ले उभारले. या सेटसाठी त्यांना 13 ते 15 कोटी रुपये खर्च आला होता.