बॉलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या स्टाईल स्टेंटमेंटमुळे चर्चेत असतात. तसेच त्यांचे वेगवेगळ्या स्टाईल व आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात. याशिवाय त्यांनी परिधान केलेले आऊटफिट व अॅक्सेसरिजच्या किंमती बऱ्याचदा ऐकायला मिळतात. या किंमती लाखोंच्या घरात असतात. पण काही सेलिब्रेटी असेदेखील आहेत ज्यांना साधेपणाने रहायला आवडतं. ते आपले कपडे किंवा अॅक्सेसरीज सामान्य लोकांप्रमाणे रस्त्यांवरून विकत घेतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी बऱ्याचदा लोकल मार्केटमधून कपडे विकत घेतात.
बॉलिवूडचा सिरीयल किसर म्हणून ओळखला जाणारा इमरान हाश्मी लाइमलाईट पासून दूरच असतो. तो त्याचे कपडे बऱ्याचदा रस्त्यावरूनच विकत घेतो.
बॉलिवूडमध्ये हटके चित्रपट करून रसिकांच्या मनात अल्पावधीत आपलं स्थान निर्माण करणारा अभिनेता राजकुमार राव खऱ्या आयुष्यात खूप साधा आहे. तो ब्रँडेड कपड्यांसोबत लोकल मार्केटमध्येही शॉपिंग करतो.
केदारनाथ ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंगला हैद्राबादमध्ये लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना पहिले होते. एका मुलाखतीत साराने ती लोकल मार्केट मधून कपडे खरेदी करते असे सांगितले होते.
छोटा पडदा ते रुपेरी पडदा असा प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे फक्त ब्रॅण्डेंड कपड्यांनाच प्राधान्य देत नाही. तर तो कपड्यांबाबत म्हणतो की, कपडे कोणतेही असोत, जर कम्फर्टेबल असाल तर तीच खरी फॅशन आहे.
अजय देवगण ची पत्नी काजोल देवगण आगामी चित्रपट तानाजीमुळे चर्चेत आहे. काजोल सुद्धा बऱ्याचदा लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना दिसते.