Join us

‘या’ पाच स्टार्समुळे तिनही खानचे करिअर धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:06 PM

गेल्या वर्षी पाच अ‍ॅक्टर्सने आपले चित्रपट आणि अ‍ॅक्टिंगद्वारा प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर अवॉर्ड शोमध्येही त्यांचा जलवा बघावयास मिळत आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीवरुन असे वाटत आहे की, जणू या स्टार्समुळे तिनही खानचे बॉलिवूड करिअर धोक्यात आले की काय?

-रवींद्र मोरेगेल्या काही वर्षात बरेच बॉलिवूड चित्रपट आलेत ज्यांनी आपल्या मजबूत स्टोरी लाइनने फक्त प्रेक्षकांनाच नव्हे तर क्रिटिक्सनाही चकित केले. कित्येक वर्षांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे तिनही खानसोबत कदाचित असे पहिल्यांदाच झाले आहे की, जेव्हा शाहरुख, सलमान आणि आमिर यांपैकी कोणाचाही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. शाहरुखचा झिरो, सलमानचा रेस 3 आणि आमिरचा ठग्स ऑफ हिंदुस्थान हे चित्रपट पूर्णपणे आदळले गेले. असे म्हटले जात आहे की, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रेक्षकांच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. याव्यतिरिक्त गेल्या वर्षी पाच अ‍ॅक्टर्सने आपले चित्रपट आणि अ‍ॅक्टिंगद्वारा प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर अवॉर्ड शोमध्येही त्यांचा जलवा बघावयास मिळत आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीवरुन असे वाटत आहे की, जणू या स्टार्समुळे तिनही खानचे बॉलिवूड करिअर धोक्यात आले की काय?* आयुष्मान खुराणा

२०१२ मध्ये विक्की डोनर या चित्रपटाद्वारा बॉलिवूड डेब्यू करणारा आयुष्मान खुराणाने गेल्या काही वर्षात वेगवगेळ्या विषयांवर चित्रपट केले. आयुष्मानने त्या विषयांची निवड केली ज्या विषयांवर काम करताना मोठमोठे स्टार्स मागेपुढे विचार करतात. २०१८ मध्ये त्याचे दोन चित्रपट रिलीज झाले- ‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’. ‘बधाई हो’ची कथा एक वृद्ध महिलाच्या प्रेग्नंट होण्यावर आधारित होती तर अंधाधुनची कथा संस्पेन्स थ्रिलर होती. दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड तोडले.* विक्की कौशल

आयुष्मान नंतर ज्या अ‍ॅक्टरची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विक्की कौशलची. अ‍ॅक्शन डायरेक्टर शाम कौशलचा मुलगा विक्कीने २०१५ मध्ये लहान बजेट चित्रपट ‘मसान’ द्वारा डेब्यू केला होता. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच अवॉर्ड शोमध्ये प्रशंसा मिळविली. २०१८ मध्ये ‘संजू’ आणि या वर्षाच्या सुरुवातीचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ नंतर विक्की कौशल सर्व मोठ्या दिग्दर्शकांचा पहिला चॉइस बनला आहे. विक्कीचे हे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षा जास्त बिझनेस करण्यात यशस्वी ठरले आहेत.* राजकुमार राव

दीर्घ स्ट्रगलनंतर अ‍ॅक्टर राजकुमार राव बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठण्यात यशस्वी झाला आहे. २०१० मध्ये राजकुमार रावने दिबाकर बॅनर्जीचा ‘लव्ह सेक्स आणि धोका’ या चित्रपटाद्वारा डेब्यू केला होता. २०१७ मध्ये राजकुमार रावच्या ‘न्यूटन’ चित्रपटाने बरेच अवॉर्ड जिंकले तर २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाने १०० कोटी पेक्षा जास्त बिझनेस केला. आता राजकुमार रावच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे.* सुशांत सिंह राजपूत

लहान पडदा ते बॉलिवूडपर्यंत मजल मारणारा सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या आशयावर चित्रपट केले. मागचे वर्ष त्याच्यासाठी संमिश्र ठरले. सारा अली खानसोबतचा त्याच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला होता. त्याचवर्षी त्याचा सोनचिडिया रिलीज झाला. या चित्रपटास तिकिट खिडकीवर जास्त प्रेक्षक मिळाले जरी नसले तरी क्रिटिक्सने सुशांतच्या अभिनयाची खूपच प्रशंसा केली.* ईशान खट्टर

शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टरने माजिद मजीदीचा ‘बियांड द क्लाउड्स’ या चित्रपटाद्वारा डेब्यू केला होता. याव्यतिरिक्त जान्हवी कपूरसोबतच्या ‘धडक’ चित्रपटातूनही त्याने खूप प्रशंसा मिळविली. ईशानने आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून ज्या प्रकारचे चित्रपट निवडले त्यानंतर असे म्हटले जात आहे की, आगामी काळात तो बरेच आणि उत्कृष्ट चित्रपट देऊ शकतो.

टॅग्स :बॉलिवूडआमिर खानसलमान खानशाहरुख खानविकी कौशलराजकुमार राव