Join us  

थेसपो नाट्यस्पर्धेत भंवरची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 2:39 AM

पृथ्वी थिएटर येथे रंगलेल्या थेसपो राष्ट्रीय नाट्य स्पर्धेमध्ये भंवर या नाटकाने बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ८० नाटक

पृथ्वी थिएटर येथे रंगलेल्या थेसपो राष्ट्रीय नाट्य स्पर्धेमध्ये भंवर या नाटकाने बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ८० नाटक आले होते. यामध्ये विराजस कुलकर्णी दिग्दर्शित भंवर या हिंदी नाटकाचा समावेश असून या नाटकाला पाच पुरस्कार मिळाले आहेत. या नाटकाच्या यशाविषयी विराजस लोकमत सीएनएक्सला सांगतो, ''भंवर हे हिंदी नाटक आहे. हे नाटक एकपात्री असून शिवराज वायचाळ आपल्या अभिनयाची चुणूक दाखविताना रंगभूमीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नाटकाला राष्ट्रीय पातळीवरच्या नाटकाला पाच पुरस्कार मिळाल्याने खरचं खूप आनंद झाला आहे.'' ज्या पृथ्वी थिएटरमध्ये मोठमोठे कलाकार आपला अभिनय सादर करत असतात. अशा ठिकाणी मला काम करण्यास मिळाले याचादेखील अधिक आनंद होत आहे. तसेच या स्पर्धेमध्ये बंगाली,गुजराती, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये नाटक करण्यात आले आहे. या सर्व नाटकांसोबत आपले नाटक सादर करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहेच असे विराजस म्हणाला आहे.