Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Video: 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे चेतन वडनेरे. या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ठिपक्यांची रांगोळीमध्ये अभिनेत्याने साकारलेलं शशांक नावाचं पात्र आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. दरम्यान, नुकताच सोशल त्याच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता चेतन वडनेरे याने गतवर्षी २२ एप्रिल रोजी अभिनेत्री ऋजुता धारपशी लग्नगाठ बांधली. चेतन-ऋजुताचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला होता. आता त्यांच्या सुखी संसाराला १ वर्ष पूर्ण झालं आहे. याचनिमित्ताने चेतन वडनेरेने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचा अनसीन व्हिडीओ शेअर केला आहे.'वर्षपूर्ती...', असं कॅप्शन देत त्यांना हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये ते दोघेही खूप आनंदात दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचेदेखील काही सुंदर क्षण यामध्ये पाहायला मिळत आहेत. चेतन वडनेरेच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वाती बऱ्याच कलाकारांनी या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्कफ्रंट
दरम्यान, चेतन वडनेरे हा मूळचा नाशिकचा असून 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकांमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. तर, त्याची पत्नी ऋजुता देखील उत्तम अभिनेत्री आहे. तिने 'आई माझी काळूबाई', 'वर्तुळ' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. चेतन - ऋजुता हे गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत.