Join us

‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’चं धमाकेदार तिसरं वर्ष ; कोण ठरणार स्टायलिश उत्सुकता शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:43 PM

स्टाइल आणि स्टायलिश व्यक्तीमत्त्व याला नवं परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा आज रंगणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदु आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक लोकमतने  स्टायलिश पैलूंना हेरण्याचं ठरवलं आहे.

दरवर्षीप्रमाणे आज  स्टाइल व्यक्तींचा मेळा भरणार आहे. स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा गौरव होणार आहे. स्टाइल आणि स्टायलिश व्यक्तीमत्त्व याला नवं परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा आज रंगणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदु आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक लोकमतने  स्टायलिश पैलूंना हेरण्याचं ठरवलं आहे. मोस्ट स्टाइलिश अवॉर्डचं आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. आज  द लिला हॉटेलमध्ये हा अनोखा आणि रंगारंग पुरस्कार सोहळा थाटात तसेच जल्लोषात पार पडणार आहे.

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आजवर आपण पाहिलेल्या पुरस्कार सोहळ्यांना छेद देणाऱ्या या सोहळ्यात बॉलीवुड, मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही सृष्टी, उद्योग जगत आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या हा सोहळ्यात अभिनेत्री  काजोल,  सिद्धार्थ मल्होत्रा,  करण जोहर  हृतिक रोशनने  प्रमुख उपस्थिती लावली होती. 

नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आलिया भट्टने सुद्धा या सोहळ्याला चारचाँद लावले होते.  तरुणाईचा फेव्हरेट आणि डॅशिंग अभिनेता अशी सुशांतसिंग राजपुतची ओळख. आपली अनोख्या स्टाइलनं आणि अभिनयाने यंग जनरेशनच्या गळ्यातला ताईत बनला आहे. दैनिक लोकमत आयोजित मोस्ट स्टाईलिश अवॉर्ड सोहळ्याला सुशांतसिंग राजपुतची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. त्यामुळे यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यातही हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतातील कलाकारांचा स्टायलीश अवॉर्डने गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :आलिया भटसुशांत सिंग रजपूतकाजोल