९० चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रविना टंडन( raveena tandon). आजवरच्या कारकिर्दीत रविनाने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यामुळेच तिच्या नावाची आजही नेटकऱ्यांची चर्चा होते. आजवर रविनाचे अनेक सिनेमा गाजले. मात्र, तिने असा एक सिनेमा नाकारला जो बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच नाही तर आजही हा सिनेमा बॉलिवूडच्या इतिहासातील ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून ओळखला जातो. परंतु, या सिनेमासाठी तिने नकार दिला आणि तो अभिनेत्री काजोलच्या पदरात पडला.
बॉलिवूडच्या इतिहासातील सुपरडुपर हिट झालेला सिनेमा म्हणजे कुछ कुछ होता है ( Kuch Kuch Hota Hai) . या सिनेमात शाहरुख खान (shahrukh khan), राणी मुखर्जी (rani mukharji) आणि काजोल (kajol) हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकले आहेत. या सिनेमामध्ये काजोलने अंजली ही भूमिका साकारली होती. परंतु, काजोलपूर्वी ही भूमिका रविना टंडना ऑफर झाली होती हे फार कमी जणांना ठावूक आहे. या भूमिकेसाठी करण जोहरने प्रथम रविनाला विचारणा केली होती. मात्र, तिने या सिनेमाची ऑफर धुडकावून लावली.
अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रविनाने याविषयी खुलासा केला आहे. सोबतच तिने हा सिनेमा नाकारण्यामागचं कारणही सांगितलं. “मला कुछ कुछ होता है ऑफर झाला होता. पण मी यासाठी स्पष्टपणे नकार दिला. करणने मला या सिनेमाविषयी विचारलं होतं. पण, या सिनेमासाठी नकार दिला. मी जी भूमिका दिली होती ती तुलनेने फारच कमकुवत होती. मला लहान भूमिका करण्यात काही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी या सिनेमात काम करण्यास नकार दिला, असं रविना म्हणाली.