Join us

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राणादा आणि अंजली बाईंसोबत 'हे' सेलिब्रिटी कपल लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:56 IST

Chala Hawa Yeu Dya:'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

झी मराठी(Zee Marathi)वरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला  पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

सध्या सुरु असलेल्या लग्नसराई मध्ये अनेक कलाकारांची देखील लग्न झाली आणि काही कलाकारांचा साखरपुडा देखील झाला. त्यातील सगळ्यात चर्चेत होते ते म्हणजे विराजास कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे आणि प्रेक्षकांचा लाडका राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोन्ही सेलेब्रिटी कपल या आठवड्यात चला हवा येऊ द्या च्या मंचावर सज्ज होणार आहेत. त्याचसोबत त्यांच्या उपस्थित चला हवा येऊ द्या मधील विनोदवीरांनी मात्र कल्ला केला. विराजास, शिवानी, हार्दिक आणि अक्षया सोबत अंशुमन विचारे त्यांच्या सौ आणि त्यांची चिमुकली देखील हजर असणार आहेत.

 या विशेष भागात चला हवा येऊ द्याच्या विनोदवीरांनी राजा हिंदुस्तानी चित्रपटावर प्रहसन सादर केलं ज्यात भाऊ अमीर खान आणि श्रेया बुगडे करिष्मा कपूर साकारणार आहेत. तेव्हा या भागातील धमाल मजा मस्ती पाहायला विसरून नका सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

टॅग्स :चला हवा येऊ द्याअक्षया देवधरहार्दिक जोशीशिवानी रांगोळेविराजस कुलकर्णी