सध्या सगळीकडे निलेश साबळे(Nilesh Sable)चा नवा शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'(Hastay Na? Hasaylach Pahije)ची चर्चा होताना दिसत आहे. या शोच्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमध्ये भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण देखील दिसणार आहे. तर अलका कुबल आणि भरत जाधव परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आजपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या एपिसोडमध्ये बाईपण भारी देवा चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. दरम्यान आता अभिनेत्री दीपा परब-चौधरी (Deepa Parab Choudhari) हिने इंस्टाग्रामवर 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या सेटवरील फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री दीपा परब-चौधरी हिने इंस्टाग्रामवर 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या सेटवरील बाईपण भारी देवा चित्रपटातील सहकलाकारांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, आजपासून महाराष्ट्रात हास्याची धमाल सुरु होणार! ही कॉमेडी टीम तुम्हाला खळखळून हसवणार. पहा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शनि आणि रवि, रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर.
'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोबद्दल...हसताय ना? हसायलाच पाहिजे या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळेने केले आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारदेखील शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. २७ एप्रिलपासून हा शो शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता रसिकांच्या भेटीला येणार आहे.