Join us

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने 120 रुपयांसाठी केलं होतं हॉटेलमध्ये काम आज आहे 18 कोटींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 08:55 IST

Actress: या अभिनेत्रीने 'ब्लॅकमेल' या सिनेमात अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर केली होती.

कलाविश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या स्टारडम, ग्लॅमरस लाइफ यांच्यामुळे चर्चेत येत असतात. परंतु, या सेलिब्रिटींमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. अनेक कलाकारांनी मोठा स्ट्रगल करुन सिनेसृष्टीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यात काही सेलिब्रिटींनी उपाशीपोटी दिवस काढले, तर काहींना घर सोडावं लागलं. सध्या या सगळ्यांमध्ये अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडसह साऊथमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने एकेकाळा चक्क हॉटेलमध्ये काम केलं होतं.

सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने कलाविश्वात येण्यापूर्वी बराच स्ट्रगल केला. घरखर्च चालवता यावा यासाठी तिने हॉटेलमध्ये काम केलं होतं. त्यावेळी तिला केवळ १२० रुपये इतका पगार मिळायचा. विशेष म्हणजे १२० रुपयांपासून कमाई करणारी ही अभिनेत्री आज १८ कोटी रुपयांची मालकीण आहे.

सध्या सोशल मीडियावर चर्चा होतीये ती अभिनेत्री म्हणजे मोनालिसा. भोजपुरी इंडस्ट्रीत आपला दबदबा निर्माण करणाऱ्या मोनालिसाने हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू यांसारख्या अनेक भाषिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सिनेसृष्टीवर तिचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतो.

खऱ्या आयुष्यात केला मोठा स्ट्रगल

मोनालिसा या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे. परंतु, करिअरमध्ये फारसं यश न मिळाल्यामुळे तिने तिचं नाव बदललं आणि मोनालिसा असं ठेवलं. मोनालिसा सिनेसृष्टीत येण्यापूर्वी तिने बराच स्ट्रगल केला आहे. सुरुवातीच्या काळात घरखर्च चालवता यावा यासाठी ती कोलकाता येथील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये गेस्ट रिलेशन्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची. परंतु, त्यावेळी तिला किरकोळ मानधन मिळत होतं. दिवसाकाठी तिला केवळ १२० रुपये मानधन मिळायचंय.

दरम्यान, मोनालिसाने २००८ मध्ये 'भोले शंकर' या सिनेमातून भोजपुरी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिचं नशीब पालटलं. या सिनेमानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. मोनालिसाने 'ब्लॅकमेल' या बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अजय देवगणने स्क्रीन शेअर केली होती. आतापर्यंत तिने जवळपास २०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती एका सिनेमासाठी प्रचंड मानधन घेत असून तिच्याकडे १८ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं सांगण्यात येतं.

टॅग्स :बॉलिवूडमोनालिसासेलिब्रिटीअजय देवगण