Join us

'ही घटना खूप लज्जास्पद...', मणिपूर घटनेवर प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 2:18 PM

अक्षय कुमार, उर्मिला मातोंडकर, संजय दत्त, कियारा आडवाणीनंतर आता ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानेदेखील मणिपूर घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

मणिपूरमध्ये तीन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांची निर्वस्त्र अवस्थेत धिंड काढऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही राज्य आणि केंद्र सरकारला दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरमधील या घटनेवर सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त करत आहेत. अक्षय कुमार, उर्मिला मातोंडकर, संजय दत्त, कियारा आडवाणीनंतर आता ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra)नेदेखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

प्रियांका चोप्राने मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर नाराजी व्यक्त केली आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तिने लिहिले की, या घृणास्पद गुन्ह्यावर ७७ दिवसानंतर कारवाई करण्याऐवजी याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामागे काय तर्क आहे? याचं कारण काय आहे? काय आ का, स्थिती आणि परिस्थितीपासून वेगळे होऊन आम्ही कोणत्याही परिस्थितीत महिलांना कोणत्याही खेळासाठी मोहरा बनवण्याची अनुमती देऊ शकत नाही.

सर्वांसाठी ही घटना खूप लज्जास्पद आहेप्रियंकाने पुढे लिहिले की, हे आपल्या सर्वांसाठी ही घटना खूप लज्जास्पद आहे आणि आपल्याला फक्त रागावर आवाज उठवण्याची गरज आहे. जेणेकरुन या घटनेतील पीडितांना लवकर न्याय मिळेल. प्रियंकाने या पोस्टसोबत काही हॅशटॅग शेअर केले आहेत ज्यात #togetherinshame आणि #justiceforthewomenofManipurचा समावेश आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रामणिपूर हिंसाचार