सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा सेलिब्रिटींच्या पोस्टची जास्त चर्चा होते. अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील काही घडामोडी, किस्से सुद्धा शेअर करत असतात. परंतु, तरी सुद्धा चाहते या कलाकरांच्या बालपणीचे वा कॉलेज जीवनातील किस्से ऐकण्यासाठी जास्त उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या आईसोबत बसलेला दिसून येतोय.
सोशल मीडियावर सध्या एका बॉलिवूड सुपरस्टारचा फोटो व्हायरल होत आहे. आज हा अभिनेता लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर त्याच्या लेकानेही बॉलिवूड सुपरहिट सिनेमा दिले आहेत. परंतु, एक काळ असा होता जेव्हा या अभिनेत्याने प्रचंड हालाखीत दिवस काढले होते. परंतु, एका सर्वसामान्य वातावरणात वाढल्यामुळे त्याच्या स्वभावात तोच साधेपणा जाणवतो.
'या' प्रसिद्ध अभिनेत्याने एकेकाळी थिएटरबाहेर विकले होते शेंगदाणे; आज आहे 212 कोटींचा मालक
तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो बॉलिवूडचा भिडू अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ याचा आहे. आज जॅकी श्रॉफने अमाप यश, प्रसिद्धी मिळवली आहे. पण, एक काळ असा होतो जेव्हा तो चाळीत राहायचा. इतकंच नाही तर हळूहळू त्याची प्रसिद्धी इतकी वाढत गेली की त्याला भेटण्यासाठी अनेक दिग्दर्शक चक्क चाळीच्या टॉयलेटबाहेर रांग लावायचे.
१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरो' या सिनेमातून जॅकी श्रॉफला पहिला मोठा ब्रेक मिळाला. या सिनेमानंतर तो इतका लोकप्रिय झाला की त्याच्याकडे सिनेमाच्या रांगा लागल्या होत्या. परंतु, इंडस्ट्रीत यश मिळाल्यानंतरही तो बराच काळ चाळीत राहत होता. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं.
"मी ज्या चाळीत राहायचो त्या चाळीत सात कुटुंबियांना मिळून तीन टॉयलेट्स दिले होते. मात्र, या तीनपैकी मला एक वेगळं टॉयलेट देण्यात आलं होतं. कारण, सकाळी लवकर उठून मला शूटिंगला जावं लागायचं. त्यामुळे चाळीतल्या लोकांनी खास माझ्यासाठी ही सुविधा दिली होती. माझा पहिला सिनेमा हिट झाल्यानंतर अनेक दिग्दर्शक, निर्माते माझ्याकडे रांग लावून उभे होते", असं जॅकी श्रॉफ म्हणाले.
दरम्यान, ज्यावेळी दिग्दर्शक, निर्माते जॅकी श्रॉफच्या घरी त्याच्याकडे सिनेमा साईन करायला गेले होते त्यावेळी तो टॉयलेटमध्ये गेल्याचं या लोकांना कळलं. त्यामुळे या सगळ्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी चक्क त्याचं घर सोडत त्याची वाट पाहत टॉयलेटबाहेर रांग लावली होती. जॅकी जवळपास ३३ वर्ष चाळीमध्ये राहिला.