आपण कितीही मोठं झालो तरीदेखील जुन्या आठवणींमध्ये खासकरुन बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला प्रत्येकालाच आवडतं. यामध्येच अनेक कलाकार त्यांच्या बालपणीचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात सध्या सोशल मीडियावर एका साऊथ इंडस्ट्रीमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती तिच्या आईसोबत दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती समुद्र किनाऱ्यावर तिच्या आईसोबत बसली आहे. विशेष म्हणजे फोटोमध्ये जरी ही अभिनेत्री अत्यंत साधीसुधी दिसत असली तरीदेखील ती कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. इतकंच नाही तर तिच्या सौंदर्याची चर्चा बॉलिवूडमध्येही होत असते. त्यामुळे हा फोटो पाहिल्यावर ही अभिनेत्री कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
फोटोत दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून साऊथ ब्युटी साई पल्लवी आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर साई पल्लवीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या बालपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या. यात एकदा तिच्या वडिलांनी तिला मारलं होतं असंही तिने सांगितलं.
“खऱ्या आयुष्यात मी एकदाच पत्र लिहिलं होतं. सातवीमध्ये असताना मी शाळेतल्या एका मुलासाठी पत्र लिहिलं होतं. पण, मी लेटरसकट पकडले गेले. त्यावेळी मला आई-वडिलांनी खूप मारलं होतं. त्यानंतर मी कोणालाही पुन्हा लव्ह लेटर लिहिण्याचं धाडस केलं नाही, असं साई पल्लवी म्हणाली.
दरम्यान, साई पल्लवी कायम तिच्या पर्सनालिटी आणि सौंदर्यामुळे चर्चेत येते. साई तिच्या सिनेमामध्ये अत्यंत कमी मेकअपमुळे चर्चेत येत असते. इतकंच नाही तर एकदा तिने २ कोटी रुपयांची एक फेअरनेस क्रीमची जाहिरात धुडकावली होती.