Join us  

चॅलेंज! फोटोत खिशात हात ठेवून उभा असलेला हा चिमुकला आज सिनेसृष्टीवर करतोय राज्य, ओळखा पाहू कोण आहे तो ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 5:47 PM

फोटोत खिशात उभा असलेला हा मुलगा साऊथ सिनेसृष्टी(South Cinema) तील एक प्रसिद्ध नाव आहे.

फोटोत खिशात उभा असलेला हा मुलगा साऊथ सिनेसृष्टी(South Cinema) तील एक प्रसिद्ध नाव आहे. आणि आजकाल प्रत्येकजण या हुक चरणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करीत आहे. या मुलाला लक्झरी लाइफस्टाइलची (Luxurious Lifestyle) आवड आहे.कोरोनाच्या काळातही त्याच्या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे.  या साऊथ अभिनेत्याकडे स्वतःचे खासगी जेट आणि करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन (Vanity Van आहे. त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये महागड्या कारची लांबच लांब रांग लागली आहे. एवढ्या हिंटनंतर तुम्हाला या अभिनेत्याचे नाव कळले असेल.

याचे नाव पुष्पा राज (Pushpa Raj) आहे, ‘पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझा क्या, फायर हूं मै’या त्याच्या डॉयलॉगने अर्ध्या भारताला वेडं लावलं आहे. फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)  आहे.

अल्लू अर्जुनला लग्झरी लाइफस्टाइल आवडते. महागड्या कार खरेदी करणे हा त्याचा छंद नसून त्याची सवय आहे.त्याच्याकडे Hummer H2, Range Rover Vogue, Jaguar XJL, Volvo XC90 T8 एक्सलन्स सारख्या कोट्यवधींच्या गाड्या आहेत.

अल्लू अर्जुनच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याचे पर्सनल लाईफही शानदार आहे. केवळ कारच नाही तर अल्लूकडे खाजगी जेट देखील आहे ज्यामध्ये त्याने प्रवास करताना आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अल्लू अर्जुनने त्याची लॉँगटाईम गर्लफ्रेंड ​स्नेहा रेड्डीसोबत २०११ मध्ये हैदराबादमध्ये लग्न केले. अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांना मुलगा अयान आणि मुलगी आरहा ही दोन मुले आहेत. अल्लू अर्जुनची मुलगी आरहा आगामी 'शकुंतलम' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाTollywoodबॉलिवूड