अभिनेता मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्यांनी मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटातही काम केले आहे. ‘डॅम्बीस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती देखील त्यांनी केली आहे. फार कमी लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे या देखील अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाहीत. मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
अभिनेता मकरंद अनासपुरे आणि शिल्पा अनासपुरे यांचे लव्हमॅरेज झाले आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी नाटक व चित्रपटात काम केले आहे. खरेतर २००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती. याकाळात मकरंद यांचे शिल्पा यांच्यावर प्रेम जडले आणि त्यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली.
लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटात काम केले. त्या दोघांनी ५ चित्रपटात एकत्र काम केले. कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यातदेखील शिल्पा यांचादेखील मोलाचा वाटा आहे.