Join us

‘जे मनापासून आवडले तेच काम स्विकारले!’-प्रिती झिंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 6:46 PM

गालावर खळी, मोहक चेहरा अन् मस्तीखोर मिजास असं वर्णन केल्यावर कुणाचा चेहरा दिसतो? अर्थात बॉलिवूडची चुलबुली गर्ल अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा. ‘सोल्जर’ या चित्रपटामुळे ती इंडस्ट्रीत चर्चेत आली. मग तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिच्याकडे चित्रपटांची रांगच लागली.

जितेंद्र कुमार

गालावर खळी, मोहक चेहरा अन् मस्तीखोर मिजास असं वर्णन केल्यावर कुणाचा चेहरा दिसतो? अर्थात बॉलिवूडची चुलबुली गर्ल अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा. ‘सोल्जर’ या चित्रपटामुळे ती इंडस्ट्रीत चर्चेत आली. मग तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिच्याकडे चित्रपटांची रांगच लागली. तिने ९०च्या दशकांतील सर्व अभिनेत्यांसोबत काम केलं. मात्र, तिच्या लग्नानंतर ती मोठ्या पडद्यापासून दुरावली गेली. आता ती पुन्हा एकदा अभिनेता सनी देओल याच्यासोबत ‘भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटात दिसणार आहे. यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या या गप्पा...

* मोठया पडद्यापासून लांब राहण्याचे कारण?- लग्नानंतर मी चित्रपटांपासून लांब राहण्याचा निर्णय मी घेतला होता. परंतु, जेव्हा सनी देओल यांनी चित्रपटाबद्दल सांगितले तेव्हा मी नाही म्हणू शकले नाही. भैयाजी सुपरहिटमध्ये माझी भूमिका खरंच खूप मजेशीर आहे. यातील माझा डायलॉग भोजपूरी भाषेतला आहे. यासाठी मी खूप मेहनत घेतली असून त्यानंतर माझी भोजपूरी भाषा सुधारली.  * तनुश्री दत्ता-नाना पाटेकर यांच्या प्रकरणाबाबत तुला काय वाटते? - मला असं वाटतं की, इंडस्ट्रीत सर्वच काही वाईट लोक नाहीत. परंतु, तनुश्रीच्या मताचा मी आदर करते. तिला मी पाठिंबा देते तिने मोठया हिंमतीने आपलं म्हणणं मांडलं. प्रसिद्धीसाठी कुणी कुणावर आरोप करेल असं होणार नाही. परंतु, त्यासोबतच आपली इंडस्ट्री इतर इंडस्ट्रीच्या तुलनेत खुप चांगली आहे. येथे प्रत्येक काम योग्य पद्धतीनेच होते. 

* आयपीएलबाबतीत काय सांगशील?- मला वाटतं की, मी आयपीएलमध्ये एन्ट्री केल्याने क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग वाढला. मी आज अभिमानाने सांगू शकते की, माझ्यामुळे भारतातील महिला या खेळासोबत जोडल्या गेल्या. माझ्या येण्यानंतर महिलांची स्टेडियममधील संख्या वाढली. हा केवळ पुरूषांचा खेळ राहिलाच नाही.         

 * ‘भैय्याजी सुपरहिट’ नंतर चित्रपटात सातत्याने काम करणार का?- होय. माझ्या पतीनेही मला चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला आहे. या चित्रपटानंतर मी दोन चित्रपटांची स्क्रिप्ट वाचली आहे. मला इंटरेस्टिंग पण वाटली आहे. लवकरच सगळं फायनल झाले की, सर्वांना कळेलच.

* आपण कमी चित्रपट केलेत, असे कधी वाटले का?  - होय. कधी कधी वाटतं की, मी फार कमी चित्रपट केले. अजून करू शकले असते. माझ्या चाहत्यांची निराशा झाली असेल. परंतु, मी सुरूवातीपासून मनोरंजनासोबतच एका वेगळया कथानकाच्या शोधात होते. मी करिअरमध्ये विचारपूर्वकच चित्रपट केले. मला जे मनापासून आवडले तेच मी केले.                                                                                                                       

टॅग्स :प्रीती झिंटासनी देओलआयपीएल २०२३मीटूतनुश्री दत्तानाना पाटेकर