बॉलिवूड क्वीन कंगना रणौतवर (Kangana Ranaut) जीव ओवळणारे अनेकजण आहेत. ३४ वर्षीय कंगना सध्या सिंगल आहे आणि एखाद्या स्पेशल व्यक्तीची वाट बघत आहे. पण बॉलिवूडचा एक अभिनेता असाही आहे जो तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याच्या पत्नीलाही सोडू शकतो. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर अनिल कपूर (Anil Kapoor) आहे. अनिल कपूरला कंगना खूप आवडते. ती त्यांना इतकी आवडते की, तिच्यासाठी तो त्याच्या पत्नीलाही सोडू शकतो. याचा खुलासा स्वत: अनिक कपूरने करण जोहरचा शो कॉफी विद करणमध्ये केला होता.
करण जोहरने अनिल कपूरला विचारलं होतं की, त्या महिलेचं नाव सांग जिच्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला सोडू शकता. यावर अनिल कपूरने कंगनाकडे इशारा केला आणि तिचं नाव घेतलं. आता भलेही अनिल कपूरने हे गंमतीत म्हटलं होतं. पण सोशल मीडिया यूजर्सना तर केवळ संधी पाहिजे ट्रोल करण्याची.
अनिल कपूर आणि सुनीता कपूरने १९८४ मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी सुनीता एक मॉडल होती आणि तिचे वडील बॅंकर होते. त्यावेळी अनिल कपूर इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात बिझी होता. आता सुनीता कॉन्स्च्यूम डिझायनर आहे. तर त्यांना सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर ही मुलं आहेत.
कंगना रणौत नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहते. कंगना तिच्या आगामी तेजस, धाकड, इमरजन्सीसहीत इतरही काही सिनेमात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा थलायवी हा सिनेमा रिलीज झाला होता. यात तिने जयललीता यांची भूमिका साकारली होती.