बॉलिवूडची पहिली फिमेल सुपरस्टार श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. मात्र पडद्यावरचा त्यांचा जबरदस्त अभिनय, त्यांनी साकारलेल्या भूमिका कोणीही विसरू शकत नाही. रानी मेरा नाम आणि सोलवा सावन या सिनेमानंतर श्रीदेवींना एका हिट सिनेमाची गरज होती. 1983 साली त्यांना ही संधी मिळाली. ‘हिंमतवाला’ या सिनेमात अभिनेता जितेन्द्र यांच्यासोबत श्रीदेवींची जोडी जमली. सिनेमा हिट झाला आणि सोबत श्रीदेवीची जादूही चालली. या सिनेमानंतर श्रीदेवी यांनी हिट सिनेमाची रांग लागली. पुढच्या तीनच वर्षांत श्रीदेवी यांचे बॉलिवूडच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये घेतले जाऊ लागले. आज आम्ही श्रीदेवींबद्दलचा ‘लम्हें’ या सिनेमाबद्दलचा एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. श्रीदेवींची प्रतीक्षा करत यश चोप्रा आणि ‘लम्हें’ची संपूर्ण टीम जयपूरमध्ये महिनाभर ताटकळत थांबली होती. का? तर या प्रश्नाचे उत्तर श्रीदेवींनी स्वत: दिले होते.श्रीदेवी व यश चोप्रा यांचे नाते वडील आणि मुलीसारखे होते. यश चोप्रांच्या लम्हे आणि चांदनी या सिनेमात श्रीदेवींनी काम केले होते. दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते. श्रीदेवी यश चोप्रा यांचा प्रचंड आदर करायच्या. त्यांना पित्यासारखे मानायचा.
एकदा एका मुलाखतीत श्रीदेवींनी ‘लम्हें’ या सिनेमादरम्यानची एक घटना सांगितली होती. त्यांनी सांगितले होते की, आम्ही संपूर्ण युनिटसोबत राजस्थानमध्ये ‘लम्हें’चे शूटींग करत होतो. अचानक हॉटेलमध्ये आराम करत असताना मला यशजींचा फोन आला. तुझ्या वडीलांना तुला भेटायचे आहे. तू लगेच घरी जाण्यासाठी निघ, असे ते मला म्हणाले. यावर मी नकार दिला. मी काही वेळापूर्वीच वडिलांची बोलले, ते ठीक आहेत. मी अशी अचानक गेले तर शूटींग थांबेल, असे मी त्यांना म्हणाले. पण यशजींनी तोपर्यंत माझे तिकिट बुक केले होते. मी चेन्नईला पोहोचल्यावर माझ्या वडिलांचे निधन झाल्याचे मला कळले. मला आईजवळ थांबणे गरजेचे होते. महिनाभर मी चेन्नईत होते. तिकडे माझ्याअभावी अख्खे शूटींग खोळंबले होते. मात्र यशजींनी या महिनाभरात मला एकही फोन केला नाही किंवा मला शूटींग कधी सुरु करतेस, असे विचारले नाही. महिनाभर ‘लम्हें’चे संपूर्ण युनिट राजस्थानात माझी प्रतीक्षा करत होते. महिनाभरानंतर मी परत गेले, तेव्हा शूटींग पूर्ण झाले.’
काळाच्या पुढची कथा‘लम्हें’ हा सिनेमा साकारताना यश चोप्रा यांनी मोठी जोखिम पत्करली होती. कारण होते या चित्रपटाची कथा. त्याकाळात या चित्रपटाची कथा प्रेक्षक स्वीकारतील की नाही, अशी शंका सर्वांनाच होती. एक मुलगी तिच्याच आईच्याच प्रियकराच्या प्रेमात पडते, असे या सिनेमाचे कथानक होते. अशी कथा तोपर्यंत कधीच हिंदी सिनेमाच्या पडद्यावर साकारली गेली नव्हती. सिनेमा अनिल कपूर व श्रीदेवी यांनी जबरदस्त अभिनय केला होता.
वयाच्या पन्नाशीत श्रीदेवींनी केले होते BOLD फोटोशूट, सोशल मीडियावर माजली होती खळबळ
श्रीदेवी ते काजोल... या स्टार्सची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का?