शिक्षण एक असे शस्त्र आहे ज्याने माणूस समृद्ध होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मते ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचेच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीचीतिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करत घेतलेले शिक्षण...ही आहे ती फुलराणी मालिकेतील मंजूची गोष्ट. आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, नोकरांनी शिक्षणाचे स्वप्न पाहू नये असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेली चिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे.
'ती फुलराणी' मालिकेत मंजूने उचललाय शिकायचा विडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:30 AM
शिक्षण एक असे शस्त्र आहे ज्याने माणूस समृद्ध होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मते ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचेच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत.
ठळक मुद्दे ती फुलराणी मालिकेत पाहायला मिळेल मंजूची गोष्ट