अभिनेता जॅकी श्रॉफ यांची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिचे हॉट फोटो सतत चर्चेत असतात. वर्षभरापूर्वी कृष्णाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे टॉपलेस फोटो शेअर केले होते. सोशल मिडियावर तिचे हे फोटो टॉपलेस पोज या टॅगने व्हायरल झाले होते. सध्या बॉयफ्रेन्डसोबतचे तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
होय, नुकतीच कृष्णा तिच्या बॉयफ्रेन्डसोबत डिनर डेटवर पोहोचली. दोघेही रेस्टॉरंटबाहेर निघताच त्यांचे फोटो कॅमे-यात कैद झालेत. यावेळी कृष्णा नेहमीप्रमाणे ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. दोघांचा रोमॅन्टिक अंदाजही यावेळी दिसला. मीडियाला पाहताच दोघेही घाईघाईत निघून गेलेत.
एबन ह्याम्स असे कृष्णाच्या बॉयफ्रेन्डचे नाव आहे. एबन हा एक ऑस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे. त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया, इस्राईल व भारताचे नागरिकत्व आहे. कृष्णा दीर्घकाळापासून त्याला डेट करतेय.
जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर हा वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.
25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. असे म्हणतात की, करण जोहरने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ इअर’साठी कृष्णाला ऑफर दिली होती. पण कृष्णाने ही ऑफर नाकारली आणि ही भूमिका नंतर आलिया भटच्या पदरात पडली. कृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे. शरीराच्या अनेक भागांवर तिने टॅटू गोंदवले आहेत.