Join us

कृष्णा श्रॉफने शेअर केला नव्या बॉयफ्रेन्डला किस करतानाचा फोटो, एक्स बॉयफ्रेन्ड म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 09:55 IST

आता कृष्णाने आपला बॉयफ्रेन्ड Nusret Gokce सोबत एक फोटो शेअर केला आहे. Nusret एका तुर्किश शेफ आहे आणि त्याचं रेस्टॉरन्ट आहे.

गेल्या महिन्यात टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने बॉयफ्रेन्ड एबन हायम्ससोबतचं रिलेशनशिप ऑफिशिअली संपवलं. तिने इन्स्टाग्रामवर फॅन  क्लबना अपील केली होती की, तिला आता एबनच्या पोस्टमध्ये टॅग करू नका. कारण आता आम्ही सोबत नाहीत.

आता कृष्णाने आपला बॉयफ्रेन्ड Nusret Gokce सोबत एक फोटो शेअर केला आहे. Nusret एका तुर्किश शेफ आहे आणि त्याचं रेस्टॉरन्ट आहे. लेटेस्ट फोटोमध्ये कृष्णा तिच्या नव्या बॉयफ्रेन्डच्या गालावर किस करताना दिसत आहे. आणि ते सेल्फी घेताना दिसत आहेत.

पण या फोटोपेक्षा सर्वांचं लक्ष वेधलं ते कृष्णाचा एक्स बॉयफ्रेन्ड आणि प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेअर एबनच्या कमेंटने. त्याने लिहिले की, 'तू तर फार लवकर मुव्ह ऑन झालीस'. त्यापुढे त्याने एक हसणारा इमोजी टाकला.

याआधी Nusret ने कृष्णाा भाऊ टायगर श्रॉफसोबत फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या फोटोसोबत त्याने भाई लिहिलं होतं. दरम्यान आता कृष्णाचा हा नवा फोटो आणि त्याच्यावरील तिच्या एक्सची कमेंट चर्चेचा विषय ठरत आहे. 

टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफबॉलिवूडसोशल मीडिया